राज्य सरकारने शेतक-यांना कांदयाला विशेष अनुदान जाहिर करावे -स्नेहलता कोल्हे


राज्य सरकारने शेतक-यांना कांदयाला विशेष अनुदान जाहिर करावे -स्नेहलता कोल्हे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव - कष्टाने पिकविलेल्या कांदा चाळीमध्ये खराब झाला तर दुसरीकडे बाजारभाव कोसळयाने कांदा उत्पादक शेतकरी मोठया संकटात सापडलेला असल्याने राज्य सरकारने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी कांदयाला विशेष अनुदान जाहिर करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे कृषीमंत्री नामदार दादाजी भुसे यांचेकडे केली आहे.

गेल्या काही महिन्यापासून जगासह देशभरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून महाराष्ट्रातही या आजाराचा मोठया प्रमाणात फैलाव झाला आहे, त्यामुळे लाॅकडाऊनमुळे ठप्प झालेल्या बाजारपेठांमुळे शेतक-यांनी पिकविलेल्या माल विक्रीअभावी खराब झाल्याने शेतकऱ्यांना आर्थीक नुकसानीला सामोरे जावे लागले.याआर्थीक विवंचनेतून जात असतांना काढलेले कांदा पिक साठवून ठेवले, त्याचेही नुकसान झाले.सध्याच्या कोसळलेल्या दरामुळे कांदयाला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादनासाठी केलेल्या खर्चाच्या निम्मा खर्चही पदरात पडला नाही. प्रतिकुल हवामानामुळे कांदा पीक सांभाळणे जिकरीचे होउन बसल्याने मातीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे. अशा चोहोबाजुने संकटात सापडलेल्या शेतक-यांना सरकारने दिलासा देण्यासाठी कांदयाला अनुदान जाहिर करावे मागील सरकारच्या काळात कांदा बाजारभाव घसरणीच्या काळात तत्कालीन सरकारने कांदयासाठी प्रतिक्विंटल दोनशे रूपये अनुदान देउन शेतक-यांना दिलासा देण्याचे काम केले होते. या सरकारनेही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कारणमिंमासा न सांगता कांदयाला विशेष अनुदान देण्याची मागणी सौ कोल्हे यांनी केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News