दौंड शहरासह तालुका कोरोना मुक्त होण्याचा मार्गावर,196 जणांचे स्वाब घेण्यात आले पैकी फक्त तीनच व्यक्तींचा अहवाल पोझिटीव,15 प्रलंबित


दौंड शहरासह तालुका कोरोना मुक्त होण्याचा मार्गावर,196 जणांचे स्वाब घेण्यात आले पैकी फक्त तीनच व्यक्तींचा अहवाल पोझिटीव,15 प्रलंबित

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहर आणि तालुका कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावर आहे,शहरातील 149 लोकांचे स्वाब पाठवले होते त्यापैकी शहरातील कास्तान चाळ एक आणि SRPF 7 जवान एक असे दोनच व्यक्ती पोझिटिव आले असल्याची माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे,तर ग्रामीण भागातील 47 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी फक्त एकच व्यक्ती पिझितिव आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी सांगितले आहे,ही तालुक्यातील जनतेसाठी आनंदाची पर्वणी आहे,उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ संग्राम डांगे,त्यांचे सहकारी कर्मचारी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक राजगे तालुक्यातील सर्व डॉक्टर,त्यांचे सहकारी कर्मचारी नर्स,दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,यवत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,सर्व पोलीस कर्मचारी यांचे 24 तास कर्तव्य आणि दौंड शहर आणि तालुक्यातील जनतेने दाखवलेला संयम,घेतलेली सुरक्षा यामुळे शहर आणि तालुका लवकरच कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे,तरीही जनतेने थोडे दिवस  असेच सहकार्य करावे आणि शासनाचे नियम पाळावे असे आवाहन डॉ संग्राम डांगे,डॉ अशोक राजगे,IPS अधिकारी ऐश्वर्या शर्मा,पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,तहसीलदार संजय पाटील,गटविकास अधिकारी गणेश मोरे,दौंड नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी केले आहे.

रिपोर्ट ची माहिती पुढीलप्रमाणे

उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 12/8/20 रोजी एकुण 149जनाचे swab तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचे report आज दिनांक 13/8/20 रोजी मध्यरात्री प्राप्त झाले. त्यापैकी एकूण 2व्यक्तीचे स्वाब positive आले आहेत तर 134व्यक्ती चे report negative आले आहेत. 15 जणांचे report अद्याप प्रलंबित आहेत Positive मध्ये 

महिला-- 1

पुरूष --1

दौंड शहर -1

Srpf group 7=1

प्रभाग--

कस्तान चाळ=1

Srpf 7=1

वयोगट--29ते  57वर्ष 

ग्रामीण -- 47 स्वाब पैकी राहू येथील 53 वर्षीय पुरुष कोरोना बाधीत असून 46जण निगेटिव्ह आले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News