विठ्ठल होले पुणे
दौंड प्रतिनिधी --- धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दौंड तहसील कार्यालयात कार्यकर्त्यांनी आज रक्ताने लिहून निवेदन दिले आहे,निवेदनात पुढीप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत,1) धनगर समाजाला एस टी प्रवर्ग आरक्षणाची अमलबजावनी करावी,२) धनगर समाजाचा साठी शासन निर्णयानुसार घोषित केलेल्या २२योजनांची अंमलबजावणी करून १००० कोटी रुपयांची तरतूद त्वरित करण्यात यावी, महत्वाची मागणी मेंढपाळ बांधवांवर होणारे हल्ले थांबून त्यांना सरक्षण मिळावे, असे धनगर ऐक्य अभियान दौंड अध्यक्ष संदीपान वाघमोडे यांनी यावेळी सांगितले.यावेळी ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.