आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक.. रक्तलिखित पत्रे लिहून इंदापूरमध्ये आंदोलन


आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक.. रक्तलिखित पत्रे लिहून इंदापूरमध्ये आंदोलन

इंदापूर. काकासाहेब मांढरे( प्रतिनिधी) :

आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत धनगर समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारला जाग यावी आणि समाजाचे प्रलंबित प्रश्न निकाली निघावेत यासाठी धनगर ऐक्य अभियानाच्या माध्यमातून आज इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवारात रक्तलिखित आंदोलन करण्यात आले.

इंदापूर येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून इंदापूर तालुका धनगर ऐक्य अभियानाच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्या रक्ताने लिहित सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा, शासनाने घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, मेंढपाळांवर होणारे हल्ले थांबावे या प्रमुख मागण्यांकरिता रक्तलिखित पत्रे लिहून आंदोलन करण्यात आले.या सर्व मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा धनगर समाज महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार अशा आशयाचे रक्तलिखित निवेदन इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना देण्यात आले.

यावेळी धनगर ऐक्य अभियानाचे प्रमुख डॉ.शशिकांत तरंगे,पुणे जिल्हा कुस्तीगिर संघाचे सदस्य महेंद्रदादा रेडके,पंचायत समिती सदस्य सतिष पांढरे,रासपचे तालुकाध्यक्ष सतिष शिंगाडे,ज्ञानदेव डोंबाळे,तेजस देवकाते, दत्तात्रय पांढरे,नानासाहेब खरात,धनाजी देवकाते,पोपट पवार,महादेव पांढरे,संपत सरक,सचिन खामगळ,बापू पारेकर,तानाजी मारकड, . देवकाते,प्रविण हरणावळ यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News