"थोडसं मनातलं" "महापालिकेने सर्व फेरीवाले आणि व्यावसायिक यांची कोविड-19 ची ॲन्टीजेन तपासणी करावी"


"थोडसं मनातलं"   "महापालिकेने सर्व फेरीवाले आणि व्यावसायिक यांची कोविड-19 ची ॲन्टीजेन तपासणी करावी"

नमस्कार मित्रांनो 

अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील  कोरोना ग्रस्तांसाठी संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच बाहेरून कोरोना ची तपासणी न करताच  आलेल्या लोकामुळे जास्त रूग्ण सापडले आहेत. महापालिका प्रशासन, पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी वेळोवेळी कठोर भूमिका घेऊन सुद्धा नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. कोविड-19 हा संसर्गजन्य विकार आहे त्यामुळे त्याची साखळी तोडणे आवश्यक आहे. यासाठीच जिल्हा प्रशासनाने सायंकाळी 7 ते सकाळी 5 पर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे. तरी देखील रात्री अपरात्री अनेक लोक विनाकारण कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय फिरताना दिसतातच. तसेच काही चायनीज च्या गाड्या रात्री उशिरापर्यंत चालू असतात. जालना महापालिकाने आज पासुन शहरातील सर्व फेरीवाले व व्यावसायिक, दुकानदार यांची सक्तीने कोविड-19 ची तपासणी करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्याच धर्तीवर अहमदनगर शहरातील सर्व फेरीवाले व व्यावसायिक, दुकानदार यांची सक्तीने कोविड-19 ची मोफत तपासणी केली तर निश्चितच कोविड-19 आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल. कारण अनेक फेरीवाले भाजीपाला व इतर व्यवसाय करतात. अशा वेळी ते शहरातील प्रत्येक भागात फिरत असतात, तेव्हा त्यांचे कडे मास्क, सॅनिटायझर नसते. तसेच अहमदनगर शहर आणि उपनगरात जो भाजीपाला बाजार भरतो त्या विक्रेत्या कडे सुद्धा सॅनिटायझर व मास्क नसतात. सोशल डिस्टन्स चा तर फज्जाच उडाला आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांची सुद्धा जाग्यावरच कोविड-19 ची ॲन्टीजन  तपासणी केली पाहिजे. कदाचित त्यामुळे सुद्धा कोरोना चा प्रसार होऊ शकतो. तसेच मार्केट मधील अनेक दुकानदार व व्यावसायिक यांचे कडे सुद्धा जिल्ह्यातील अनेक छोटे छोटे व्यापारी  माल घेण्यासाठी येतच असतात. त्यामुळे मुळे कोरोना चा प्रसार होऊ शकतो. प्रत्येक वेळी ग्राहकच कोरोना संसर्गित असतो असे नाही. सध्याची परिस्थिती पहाता अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील जनता दररोज बाजारात जातच आहे. काही लोक माल विकणारे असतात तर काही ग्राहक असतात. आता तर शासकीय दवाखान्यात दररोज जवळपास एक हजार लोकांची कोरोना चाचणी करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे जे लोक फेरीवाले व्यावसायिक आहेत त्यांनी कोविड-19 ची तपासणी केल्याशिवाय त्यांना बाजारात फिरण्यासाठी महापालिका प्रशासन यांनी मनाई केली पाहिजे. अनलाॅकडाऊन भाग 3 मध्ये अनेक शिथिलता आणली आहे त्यामुळे काही व्यावसायिक नियम पाळूनच व्यवसाय करतात तर काही व्यावसायिक नियमाचे उल्लंघन करतात. त्यामुळे सुद्धा कोरोना चा प्रसार होऊ शकतो. म्हणून महापालिका प्रशासन यांनी व्यावसायिक यांची सुध्दा शासकीय दवाखान्यात विनामूल्य तपासणी करून घेतली पाहिजे. असे केले तर आणि तरच कोरोना चा काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. सध्याची परिस्थिती पहाता लोकांना अर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. तशातच जे कोरोना चे पेशंट आहेत त्यांना सुद्धा पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कोविड-19 ला आटोक्यात आणणे हा एकच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी सर्व सामान्य जनता आणि प्रशासन यांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. सध्या कोविड-19 ची संख्या जरी वाढत असली तरी रूग्ण ठणठणीत बरे होण्याचे प्रमाण सुद्धा चांगले आहे ही सुद्धा दिलासा देणारी बाब आहे.      अहमदनगर जिल्ह्यात आज दुपारपर्यंत नव्या ६८ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील  एकूण करोना बाधितांची संख्या आता १०, ६९४ झाली आहे. या रूग्णांचे पैकी ७,७४१ जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण  ७२.३९  टक्के आहे.  आता सध्या फक्त  २,८३५ रुग्णांवर वेगवेगळ्या हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. परंतु या कोविड-19 मुळे दुर्दैवाने ११८ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निश्चितच चांगले आहे. परंतु कोरोना पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी अजुनही काळजी घेणे आवश्यक आहे. जर अहमदनगर महापालिका प्रशासन यांनी जालना महापालिकाचे धर्तीवर फेरीवाले, भाजीपाला विक्री करणारे,आणि व्यावसायिक व दुकानदार यांची ॲन्टीजन कोविड-19 ची तपासणी मोफत केली तर निश्चितच कोविड-19 आटोक्यात येण्यासाठी मदत होईल यात शंकाच नाही. नागरिकांनी सतर्क रहावे व खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर कोविड-19 चे लक्षण दिसत असतील तर निःसंकोचपणे स्वतः ॲन्टीजन चाचणी शासकीय दवाखान्यात मोफत करून घेतली पाहिजे. कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, डाॅक्टर आणि नर्स, सफाई कर्मचारी, समाजसेवक आणि सामाजिक संस्था हे मोलाचे योगदान देत आहेतच. आपण नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, आपण सुद्धा प्रशासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन केले तर निश्चितच कोविड-19 आटोक्यात येऊ शकतो. कुठे ही कामाला जाताना, नोकरी व व्यवसाय करताना मास्क आणि सॅनिटायझर वापरलेच पाहिजे आणि सोशल डिस्टन्स ठेवला पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडू नये हि विनंती आहे. घरीच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर

जाहिरात
Search
विडिओ
Recent News