कोविड-19 संक्रमण काळात पदोन्नती मार्चबाबत अरुण गाडे यांचा महाराष्ट्र दौरा... गौतम कांबळे यांची माहिती


कोविड-19 संक्रमण काळात पदोन्नती मार्चबाबत अरुण गाडे यांचा महाराष्ट्र दौरा... गौतम कांबळे यांची माहिती

विठ्ठल होले पुणे

प्रतिनिधी --- महाराष्ट्र शासन  मागासवर्गियांचे पदोन्नतीबाबत ऊदासिन असुन मंत्रालयातील अधिकारी शासनाची व जनतेची दिशाभूल करित आहे.म्हणून सत्य जनतेसमोर आणने आवश्यक आहे.सर्वोच्च न्यायालयात 21 आगस्टला अंतिम सुनावणी आहे.निष्णात वकिलाची नैमणूक करावी तसेच ऊच्चस्तरिय समिती गठित करुन निर्णय घ्यावा याबाबत कास्ट्राईब कल्याण महासंघाने सतत पाठपूरावा केलेला आहे.

शासनावर वचक निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात जनता संघठित व जागृत व्हावी या ऊद्देशाने नागपूर ते मुंबई मार्च  आयोजित करण्याबाबत पूर्वतयारी म्हणून

मा.अरुण गाडे अध्यक्ष  महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांचा महाराष्ट्र दौ-याला सुरवात झाली असुन  कोविड -19संक्रमणामुळे घराबाहेर कुणिही निघण्यास तयार नसतांना संघटनेच्या हितासाठी संघटनेचे कार्य या कोविड काळात कसे सुरु आहे,पदाधिका-यांना काय अडचणी आहेत.शासन कितपत सहकार्य करित आहेत याबाबत आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा आयोजित केला आहे . तसेच मुख्य बाब म्हणजे पदोन्नतीतिल  आरक्षणा बाबत नागपूर ते मुंबई नियोजित लाँगमार्च संबधात जनजागृती अभियान करण्यासाठी पूर्व तयारी दौरा आयोजित आहे. कृपया संबधित कास्ट्राईब महासंघाचे पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी.

1)बुधवार दि.12/8/2920 सांय 5.00वाजता.नागपूर ते अमरावती रात्री अमरावती मुक्काम

2)गुरुवार दि.13/8/2020 सकाळी 7.00 वाजता अमरावती वरुन प्रयाण अकोला करिता 900वाजता अकोला येथे पं.कृ.वि.गेष्ट हाऊस येथे येणार सकाळी.9.30ते 10.00पदाधिकारी यांचेसोबत चर्चा .

3)10.30 अकोला ते धुळे प्रयाण 4.00वाजता धुळे येथे पदाधिकारी यांचे सोबत चर्चा

4)दु.4.00वाजता धुळे ते मालेगाव 5.00वा.मालेगाव पदाधिकारी यांचेषसोबत चर्चा व 5..30वाजता मा.कृषिमंत्री यांचेसोबत शिष्टमंडळासह भेट

5)सांय 6.00 वाजता मालेगाववरुन प्रयाण 8.00 वाजता नाशिक रात्री शासकीय विश्रामागृह येथे मूक्काम.

6)शुक्रवार दि.14/8/2020 नाशिक येथे विभागिय आयुक्त नाशिक आणि  वैद्यकीय विज्ञान विद्यापीठ कुलुगुरु यांचेसोबत मागासवर्गिय विद्यार्थ्यांच्या मेडीकल प्रवेशसंबधी निवेदन सादर करणे.

दु.2.00वाजता नाशिक विभाग पदाधिका-यांची बैठक

7)दुपारी 3.00वाजता नाशिक ते अहमदनगर सांय 6.00वाजता पुणे विभाग व इतर पदाधिकिऱ्यांची बैठक

8)सांय 8.00वाजता अहमदनगर ते औरंगाबाद 

रात्री 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह औरंगाबाद व मुक्काम

9)शनिवार दि.15/8/2020 औरंगाबाद विभागिय पदाधिकारी यांची बैठक सकाळी.10.00वाजता 

10)सकाळी 11.00 औरंगाबाद ते परभणी  दु.4.00वाजता लातुर विभागिय पदाधिकारी बैठक

11)रविवार दि.16/8/2020 परभणी ते नांदेड सकाळी 10.00वाजता.दु.1.00ते 3.00बैठक व परत रात्री मुक्काम परभणी 

12)सोमवार दि 17/8/2020 जिल्हाधिकारी परभणी यांची भेट व कृषि विद्यापीठ  विश्रामगृह येथे  बैठक.

सायं 5.00  नागपूरकडे प्रयाण.व्हाया अमरावती.

कृपया सर्व कास्ट्राईब पदाधिका-यांनी नोंद घेऊन त्याप्रमाणे बैठकीचे आयोजन करणे तसेच विश्रामगृह आरक्षित करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News