आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ४००० मास्क वाटप


आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ४००० मास्क वाटप

आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क वाटप करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

                आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला.मात्र कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे.त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदीप देवळालीकर यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये प्रत्येक कुटुंबाच्या घरोघरी जावून ४००० मास्कचे वाटप करून  नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, हिरामण गंगूले, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, वाल्मिक लहिरे, रमेश गवळी, संदीप कपिले, निलेश डांगे, गणेश लकारे, धनंजय कहार, महेश उदावंत, करण दळवी, अमोल देवकर, सचिन खैरनार, शुभम भुजबळ, कैलास नागरे, प्रकाश भडकवाडे, अनिल उदावंत, तुषार चिकने, समर्थ दीक्षित, गौरव जंगम, बाळा देवकर, महेश आमले आदी उपस्थित होते.

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News