राज्यातील १ कोटी ५३ लक्ष कार्ड धारकांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिळणार मोफत चणाडाळ


राज्यातील १ कोटी ५३ लक्ष कार्ड धारकांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिळणार मोफत चणाडाळ

राज्यातील १ कोटी ५३ लक्ष कार्ड धारकांना जुलै ते नोव्हेंबर महिन्यासाठी मोफत चणाडाळ वितरणास मंत्रिमंडळाची मान्यता - छगन भुजबळ                    

शिर्डी (प्रतिनिधी),राजेंद्र दूनबळे 

-  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभुमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना २४.५७ लाख कार्डधारक लाभार्थी व प्राधान्य कुटुंबातील १.२८ कोटी लाभार्थी असे एकुण १.५३ कोटी कार्डधारक लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका धारकास १ किलोग्रेम प्रमाणे अख्खा चना ऐवजी मोफत चणाडाळ वाटप करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (PMGKY) अंतर्गत माहे जुलै २०२० ते माहे नोव्हेंबर २०२० या कालावधीत पात्र शिधापत्रिकांना प्रति शिधापत्रिका १ कि.ग्रॅ अख्खा चना वितरीत करण्यात येणार होते. त्यानुसार अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील एकूण १ कोटी ५३ कार्डधारक महाराष्ट्रात आहेत. सदर कार्डधारकांना ८६ हजार २५८ मे.टन चना वितरीत करण्यात येणार होता. परंतु राज्यात अख्खा चना खाण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच महाराष्ट्रात आगामी गणेशोत्सव व दिवाळी सन लक्षात घेता चणा डाळीची मागणी अधिक असल्यांने राज्यातील १ कोटी ५३ लक्ष लाभार्थीं कार्डधारंकाना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत डाळ वितरीत करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार पात्र कार्डधाकांना प्रति कार्ड १ किलो चनाडाळ मोफत वितरित करण्यात येणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News