सोलापूर विभागीय रेल्वे सलागार समितीच्या सदस्यपदी हरजितसिंह वधवा यांची निवड


सोलापूर विभागीय रेल्वे सलागार समितीच्या सदस्यपदी हरजितसिंह वधवा यांची निवड

नगरमध्ये रेल्वेचे हॉस्पिटल होण्यासाठी प्रयत्न करणार

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) सोलापूर विभागीय रेल्वेच्या विभागीय प्रवाशांच्या अडचणींच्या निवारणासाठी असलेल्या समितीच्या (सोलापूर विभागीय रेल्वे युझर्स कंन्सल्टेटिव्ह कमिटी) सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते, घर घर लंगर सेवेचे प्रणेते, उद्योजक हरजितसिंह वधवा यांची निवड झाली आहे. त्यांची नियुक्ती मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि अ‍ॅग्रीकल्चर मार्फत झाली आहे. ही निवड सन 2020 ते 2022 अशा दोन वर्षांसाठी आहे.

या समितीवर वधवा यांची पाचव्यांदा निवड झाली आहे. वधवा अनेक वर्षांपासून सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी आणि दोन वेळेस सेंट्रल रेल्वेच्या झोनल कंन्सल्टेटिव्ह कमिटी सदस्यपदी ही कार्यरत होते. आतापर्यंत त्यांनी रेल्वेच्या सुविधांबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित करून ते मार्गीही लावले आहेत. त्यात नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम, नगरच्या स्टेशनचे सुशोभीकरण, तेथील सुविधा, अनधिकृत विक्रेत्यांचा प्रश्‍न, तत्काळ तिकिटातील गैरव्यवहार, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच नगरला न थांबणार्‍या गाड्यांना थांबा मिळण्याबाबतचा प्रश्‍न आदी विषयांवर ते सातत्याने आवाज उठवत आहेत. शिर्डी-नगर-मुंबई फास्ट पॅसेंजरला सात ऐवजी 18 डबे जोडावेत, तसेच नगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी ट्रेन सुरू व्हावी या करीता ते सतत पाठपुरावा करून, त्यांनी अशी मागणी वेळोवेळी रेल्वेकडे सादर केली आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यामार्फत रेल्वेशी संबंधित एखादा उद्योग नगरमध्ये आणण्यासाठी तसेच नगर पुण्यासाठी इंटरसिटी करीता त्यांचा पाठपुरावा देखील सुरु असल्याने लवकरच ते आपल्या सर्वांसाठी फायद्याचा होईल असा विश्‍वास वधवा यांनी व्यक्त केला आहे.

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला विलंब झाला परंतु ते पूर्ण करण्यास सतत पाठपुरावा या समितीच्या मीटिंग मध्ये करण्यात येईल, तसेच लोकडॉउन मध्ये श्रमिक रेल्वेच्या मार्गाने परराज्यातील कामगारांना सुविधा दिल्याबद्दल आणि पुढे आता अनलॉक मध्ये सर्व नियम पाळून सर्व रेल्वे पुन्हा टप्याटप्याने सुरू करण्यात यावी हि मागणी देखील करण्यात येणार आहे. उद्योजक अरविंद पारगावकर यांच्या मार्गदर्शानाखाली एमआयडीसी येथील उद्योजकांचे प्रश्‍न देखील या वेळेस उवस्थित करण्यात येणार आहेत. रेल्वेचे नगरमध्ये हॉस्पिटल नाही. त्यासाठी नगर ते कोपरगाव दरम्यानच्या रेल्वे कर्मचार्‍यांना पुण्याला जावे लागते. नगरमध्ये रेल्वेचे अद्ययावत हॉस्पिटल झाल्यास कर्मचार्‍यांबरोबर प्रवाशांनाही त्याचा लाभ होईल. त्यामुळे असे रुग्णालय नगरला होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News