पड जमीनी लॅण्ड पुलिंग योजनेला देण्यास इसळक, निंबळकच्या ग्रामस्थांची तयारी


पड जमीनी लॅण्ड पुलिंग योजनेला देण्यास इसळक, निंबळकच्या ग्रामस्थांची तयारी

मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळाची ग्रामस्थांसह बैठक

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शिवारात वृक्षरोपण

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - इसळक व निंबळक (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शिवारात वृक्षरोपण करुन खडकाळ पड जमीन लॅण्ड पुलिंग योजनेला देण्याचा निर्णय घेतला. मंगळवार दि.11 ऑगस्ट रोजी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळाची ग्रामस्थांसह प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकित ग्रामस्थांनी पड जमीनी लॅण्ड पुलिंग योजनेला देण्याची तयारी दर्शवली निर्णय असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

लष्कर के.के. रेंजच्या युध्दसराव भूमीच्या विस्तारासाठी काही गावांच्या जमीनी ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी लष्कराचे अधिकारी गावाचे सर्वेक्षण करीत आहे. लष्कराला जमीन देण्यास अनेक ग्रामस्थांचा विरोध आहे. तर इसळक, निंबळकच्या खडकाळ पड जमीन लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प राबविण्यास उपयुक्त असल्याने सदर प्रकल्प उभारण्यासंदर्भात ग्रामस्थांशी संघटनेच्या वतीने चर्चा करण्यात आली. निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी उपसरपंच घनश्याम म्हस्के, अ‍ॅड. कारभारी गवळी, भाऊराव गायकवाड, अविनाश आळंदीकर, शिवाजी खामकर, समीर पटेल, महेश म्हस्के, बाबासाहेब पगारे, प्रदिप पोतदार, महेश गोपाळकृष्णन आदि उपस्थित होते.   निंबळक, इसळक शिवारात सुमारे 350 एकर खडकाळ जमीन पडून आहे. काही पिकत नसल्याने या पड जमीनीवर अनेक वर्षापासून शेती करण्यात आलेली नाही. हायब्रीड लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून घरे होण्यासाठी सुमारे 120 एकर जमीन देण्यासाठी शेतकरी तयार झाले आहेत. उर्वरीत शेतकर्‍यांनी या योजनेसाठी जमीनी दिल्यास लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेतंर्गत शहरातील 20 हजार घरकुल वंचितांचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. शिवाय जमीन देणार्‍या शेतकर्‍यांना जमीनीच्या बाजारभावाच्या मोबदल्यात तीप्पट फायदा होणार आहे. शासनाने लॅण्ड पुलिंग व संयुक्त भागीदारी धोरण स्विराले असताना, जागा देणार्‍या शेतकर्‍यांना 35 टक्के बांधलेली घरे दिलेल्या जागेच्या प्रमाणात परतावा म्हणून मिळणार आहे. तर बाजारभावाच्या निम्म्या किंमतीत घरे घरकुल वंचितांना उलब्ध होणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी वृक्षरोपणाने निसर्गाला वंदन करुन इसळक व निंबळक येथील खडकाळ पड जमीनी लॅण्ड पुलिंग योजनेसाठी घेण्याकरिता संघटनेने पुन्हा प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी ग्रामस्थ देखील सकारात्मक आहे. शहर व एमआयडीसी जवळ असल्याने सदर जमीन पंतप्रधान आवस योजनेसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. विलास लामखडे यांनी पड जमीनीच्या मोबदल्यात शेतकर्‍यांचा चांगला फायदा होणार असेल तर ही  योजना राबविण्यास हरकत नाही. या योजनेसाठी शेतकर्‍यांनी देखील आपली जमीनी देण्यासंबंधी विचार करण्याचे त्यांनी आवाहन केले. सरकारने पुढाकार घेऊन लॅण्ड पुलिंग योजना कार्यान्वीत करावी व मुलभूत सुविधा उपलब्ध करुन घरकुल वंचितांचा प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News