करंजखोप येथे स्व.किसन उर्फ आबासाहेब वीर यांची जयंती साजरी !!


करंजखोप येथे स्व.किसन उर्फ आबासाहेब वीर यांची जयंती साजरी !!

संभाजी गोसावी. कोरेगाव (प्रतिनिधी)

सातारा -दि.११ ऑगस्ट रोजी कोरेगाव तालुक्यातील करंजखोपर येथे स्वातंत्रवीर स्व.किसन(आबासाहेब विर) यांची जयंती सोशल डिस्टिगशनचे नियम पाळुन साजरी करण्यात आली वाई तालुक्यातील कवठे गावचे भुमीपुत्र असलेले किसन उर्फ आबासाहेब विर यांनी स्वातंत्र मुक्ती संग्रामात महात्मा गांधी तसेच क्रांतीवीर नाना पाटील यांच्या खांदयाला खांदा लावुन इंग्रजाविरूध्द लढा दिला.

दि.११ऑगस्ट रोजी सातारा जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची जयंती साजरी केली जाते.या पाश्र्वभुमीवर कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथे सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती मा.मंगेश धुमाल यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केला.  यावेळी सभापती मंगेश धुमाल यांचा हस्ते कोरोना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्या साठी आर्सेनीकअल्बम 30 या गोळ्यांचे गावातील प्रत्येक कटुंबास वाटप करण्यात आले.

 यावेळी सरपंच लालासो नेवसे उपसरपंच आनंदराव शिदे,श्री . पाडुरंग तात्या धुमाळ,श्री प्रकाश बाबर,धनंजय धुमाल,श्री रामचंद्र सोनविणे,श्री विश्वास भाऊ धुमाळ श्री सतिश धुमाळ श्री नारायण कणें चंद्रशेखर भाऊ धुमाल धनसिंग सोनविणे सर राजेद्र ह धुमाळ तसेच ग्रामपंचायतचे आजी माजी पदधिकारी व ग्रामस्थ यांनी हि स्व.आबांना आदरांजली वाहली .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News