रुग्ण हक्क परिषदेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निखिल भोसले


रुग्ण हक्क परिषदेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निखिल भोसले

अहमदनगर-  प्रतिनिधी ,राजेंद्र दूनबळे,

राहुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते निखिल भोसले यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी आज निवड करण्यात आली. 

    रविवारी ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी रुग्ण हक्क परिषदेच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अध्यक्षस्थानी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, केंद्रीय सचिव दिपक पवार, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन खरात उपस्थित होते.

      अहमदनगर मधील प्रत्येक  तालुक्यातील तरुणांना संघटीत करणारे निखिल भोसले यांनी जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शाखा बांधणी करून संघटना वाढविण्यासाठी, लोकांची कामे व रुग्णांच्या हक्कासाठी लढणार असल्याचे सांगितले. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News