विठ्ठल होले पुणे
दौंड प्रतिनिधी --- दौंड अहमदनगर रस्त्यावर कंटेनर बंद पडल्यामुळे ट्रॅफिक जॅम झाले होते,दौंड पोलिसांनी भर पावसातही आपले कर्तव्य बजावत ट्रॅफिक हटवून रस्ता मोकळा करून दिला.दौंड अहमदनगर रस्त्यावर नगर चौक ते भीमा नदी येथील काष्टी टोल नाक्या दरम्यान एक कंटेनर बंद पडल्यामुळे ट्रॅफिक जॅम झाले होते,आणि रात्री पावसाची रिपरिप रात्रभर सुरू होती, कंटेनर बंद पडल्यामुळे कोणतीच गाडी ये जा करत नव्हती,दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना कोणीतरी फोन करून ट्रॅफिक जॅम विषयी सांगितले,त्यानंतर त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल सूरज गुंजाळ, किरण राऊत यांना पाठवले, त्यानंतर रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी रणशिंग, सूनिल सस्ते,पो हवा पांडुरंग थोरात हे त्यांच्या मदतीला आले , भर पावसात रात्री नऊ ते पहाटे एक वाजेपर्यंत ट्रॅफिक हटवून रस्ता खुला करून देऊन या सर्वांनी आपले कर्तव्य बजावले आहे.