९ ते १५ ऑगस्ट श्रीरामपुर जिल्हा आणि देवळाली तालुका जनजागृती अभियान


९ ते १५ ऑगस्ट श्रीरामपुर जिल्हा आणि देवळाली तालुका  जनजागृती अभियान

श्रीरामपुर जिल्ह्यासाठी महसूल मंत्री ना.थोरातांनी प्रतिष्ठा पणाला लावावी

देवळाली प्रवरा प्रतिनिधी / विजय एस भोसले 

छोटे-छोटे जिल्हे करुन महसुल वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाला जोडावीत. प्रायोगिक तत्त्वावर कमी खर्च येणारा श्रीरामपुर जिल्हा निर्मितीसाठी राजकिय वजन वापरुन राज्याचे ज्येष्ठ महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरातांनी प्रतिष्ठा पणाला लावावी अशी आर्तहाक देत जोरदार मागणी श्रीरामपुर जिल्हा कृती समिती उपाध्यक्ष राजेंद्र  लांडगे यांनी केली आहे.

देवळाली येथे शेतकरी पुतळा येथे क्रांती दिनाचे औचित्य साधत ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट श्रीरामपुर जिल्हा आणि देवळाली तालुका  जनजागृती सप्ताह अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ५० वर्षापासून श्रीरामपुर जिल्हा होण्याची मागणी असलेचे सामाजिक भावनेतून राजेंद्र लांडगे बोलत होते.यावेळी क्रांतीसिह नाना पाटील यांचे प्रतिमेस माजी नगराध्यक्ष जगन्नाथ चव्हाण यांचेसह डाॅ.तनपुरे कारखाना माजी संचालक मच्छिंद्र शिंदे नगरसेवक तुषार शेटे,श्रीकांत कदम, बाळासाहेब मुसमाडे, राजेंद्र कोळसे,गिताराम शेटे, एसएस झावरे, प्रवीण देशमुख, भाऊसाहेब चव्हाण, प्रवीण औटी,विलास चव्हाण, गोविंद टिक्कल, वैभव कोळसे आदिंनी अभिवादन केले. तसेच या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जगन्नाथ चव्हाण यांनी श्रीरामपुर जिल्हा कृती समितीचे मनोबल वाढवत आम्ही सदैव बरोबर असलेने सांगत समिती करत असलेल्या कार्याचे कौतुकही केले. सर्वात मोठा अनं ५० लाखापर्यंतची लोकसंख्या अशी नगर जिल्ह्याची ओळख आहे. करोना प्रादुर्भावात मौलीक कामगिरी बजावतांना प्रशासन मोठी कसरत करत आहे. महाविकास आघाडी  सरकारला अनुभवी आणि ज्येष्ठ महसुल मंत्री म्हणून दुस-यांदा ना. बाळासाहेब थोरातांचे रुपाने लाभले आहे. सन २०१४ मध्येही ना.थोरात महसुल मंत्री होते. त्यांनी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन नविन पालघर जिल्हा केला. योगायोगाने ना.थोरातांनी नगर जिल्ह्याचे पालकत्वही स्वीकारले आहे. मथ्यंतरी ज्येष्ठ महसुल मंत्री बाळासाहेब थोरात याच जिल्ह्यातील असुन तेच जिल्हा विभाजन प्रश्न मार्गी अशी ग्रामविकास तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफांनी भूमिका स्पष्ट केली. या आधारे लवकरच महसुल मंत्री ना.थोरातांसह पालकमंत्री ना. मुश्रीफ, जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, नगरविकास, ऊर्जा मंत्री ना.प्राजक्त तनपुरे आणि सर्व लोक प्रतिनिधींकडून जिल्हा विभाजन अपेक्षापुर्तीच्या सामाजिक भावनेतून जिल्हा प्रेमीं वर्षानुवर्ष व्यक्त करत आहे..आवर्ती-अनावर्ती खर्चाचा विचार करता सर्वात कमी खर्च श्रीरामपुर जिल्ह्यासाठी येणार आहे.सध्या निकषाचे आधारे बहुतांशी सरकारी कार्यालये श्रीरामपुरात कार्यान्वीत आहे. उर्वरित कार्यालयासाठी मुबलक जागाही आहेत. अनेक ठिकाणी अवघ्या आठ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांना स्वतंत्र जिल्हाधिकारी आहे.आणि नगर जिल्ह्याची लोकसंख्या मात्र ५० लाख असतांनाही एकच जिल्हाधिकारी आहे. हा फार मोठा अन्याय सातत्याने जिल्हावासीयांवर होत असलेची नाराजी कार्याध्यक्ष बाबासाहेब औताडेंसह अनेकांनी खंत व्यक्त केली.

तसेच जिल्हा विभाजन झाल्यास दक्षिणेसह उत्तर जिल्ह्यासाठी स्वतंत्र निधी मिळेल.त्याच बरोबर अनेक कल्याणकारी योजना प्रशासकीय यंत्रणेला सहजतेने राबविता येतील. नवीन नवीन उद्योग धंदे वाढतील. सर्व सामान्यांच्या क्रयशक्तीसह शासनाला सुध्दा सकारात्मक महसूल मिळेल असा विश्वास राजेंद्र लांडगे यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना शेवटी व्यक्त केला. जिल्हा  विभाजनाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी श्री राजेंद्र लांडगे यांनी सहा वर्षापासून केलेले प्रयत्न व त्यातील सातत्य यासाठी डाॅ.तनपुरे कारखाना माजी संचालक मच्छिंद्र शिंदे नगरसेवक तुषार शेटे,श्रीकांत कदम, बाळासाहेब मुसमाडे, राजेंद्र कोळसे,गिताराम शेटे, एसएस झावरे, प्रवीण देशमुख, भाऊसाहेब चव्हाण, प्रवीण औटी,विलास चव्हाण, गोविंद टिक्कल, वैभव कोळसे इत्यादींनी  कौतुक केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News