चर्मकार बंधूंनी हक्काच्या छतातून कुटुंबाचा आर्थिक उत्कर्ष साधावा !! आमदार - आशुतोष काळे.


चर्मकार बंधूंनी हक्काच्या छतातून कुटुंबाचा आर्थिक उत्कर्ष साधावा !! आमदार - आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

        कोपरगाव - रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या चर्मकार बंधूंना मिळालेल्या हक्काच्या छतातून आपल्या चर्मोद्योगाला चालना देवून आपल्या कुटुंबाचा आर्थिक उत्कर्ष साधावा असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

              संत रोहिदास महाराज चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील जवळपास ४४ लाभार्थ्यांना ४० हजार रुपये किंमतीचे १७.६० लाख रुपयांचे पत्रा स्टॉलचे व व्यवसाय साहित्य  घेण्यासाठी रोख स्वरूपात २२ हजार रुपयांचे वितरण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम,चेर्मोद्योग जिल्हा व्यवस्थापक एस.एम.तडवी, समाज कल्याण निरीक्षक बी.व्ही. देव्हारे,अमोल राऊत,जिनिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, नगरसेवक मंदार पहाडे,सुनील शिलेदार,अजीज शेख,प्रसाद साबळे,डॉ. तुषार गलांडे, अॅड.मनोज कडू,रावसाहेब साठे, सौ.राधा गवळी,सौ.सुनिता पोटे, पोपट दुशिंग,चांगदेव भागवत, राजेंद्र कांबळे,संतोष बनसोडे, भास्कर कांबळे,नंदकुमार कांबळे आदी लाभार्थी उपस्थित होते.

 संत रोहिदास महाराज चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील जवळपास ४४ लाभार्थ्यांना पत्रा स्टॉलचे वितरण करतांना आमदार आशुतोष काळे.

           यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी शासनाच्या सर्वच योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.त्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला उन्हा-तान्हात व वेळप्रसंगी पावसात बसून चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरूस्त करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकरी हातांना पाऊस व उन्हा-तान्हापासून संरक्षण मिळावे.या व्यावसायिकांनी तयार केलेल्या मालाला सुरक्षित जागा मिळावी.रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या अशा व्यावसायिकांचे जीवनमान उंचावून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी आपण यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.जाहिरात
Search
विडिओ
Recent News