(सोमेश्वर कारखान्याचे संचालक गणेश चांदगुडे व पो. पाटील गणेश चांदगुडे यांनी घेतला पुढाकार )
सुपे प्रतिनिधी / सचिन पवार
येथील खोपवाडी ( दंडवाडी) गावात दोन कुंटूबात अनेक वर्षांपासून जमिनीचा सुरू असणाारा वाद अखेर समोपचाराने मिटवण्यात आला ,काही दिवसापूर्वी या दोन कुंटूबात जोरात भांडण झाले आणी त्या भांडणाच रूपांतर मारामारी मध्ये झाले आणी दोन्ही कुंटूबावर पोलिस ठाण्यात एकमेकां विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले होते, भविष्यात या कुंटूबात पुन्हा मोठा वाद निर्माण होऊ शकतो व कोर्टाची पायरी चढण्याची वेळ शेतकऱ्यावर येऊ नये हे लक्षात घेऊन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणेश चांदगुडे आणि दंडवाडी गावचे पोलीस पाटील गणेश चांदगुडे यांनी पुढाकार घेऊन दोन्ही कुंटूबांना एकत्र बसवून घेेत त्यामधील वादाचे मुळ समजुन हा वाद मिटवला,जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, मा:सभापती पोपट पानसरे यांच्या मध्यस्थीने अनेक वर्षांपासून असेला वाद यशस्वीपणे मिटवला, यावेळी प्रगतशील शेतकरी सुभाष आप्पा चांदगुडे, राजकुमार लव्हे, शांताराम चांदगुडे सतिष जगदाळे उपस्थित होते