विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकास्तरीय सहसमन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर किरण काळे यांची घोषणा


विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकास्तरीय सहसमन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर  किरण काळे यांची घोषणा

नगर (:प्रतिनिधी संजय सावंत) विद्यार्थी कॉंग्रेसच्या (एनएसयूआय) तालुकास्तरीय सहसमन्वयकांच्या नियुक्त्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आल्या आहेत. युवक व विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हा समन्वयक किरण काळे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे.*

*नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :* *अमोल शेटे* (मूळ तालुका - श्रीरामपूर) - देण्यात येणारा तालुका नेवासा, *सार्थक करमासे* (राहाता) – राहुरी, *गौरव डोंगरे* (संगमनेर) -  राहाता,  *राम जहागीरदार* (कर्जत) – कर्जत आणि जामखेड, *आदेश शेंडगे* (श्रीगोंदा) -  श्रीरामपूर, *शुभम वाकचौरे* (अकोले) – अकोले, *युवराज पवार* (राहुरी) – संगमनेर, *आदिल शेख* (श्रीगोंदा) – पारनेर, *शेखर सोसे* (संगमनेर) – कोपरगाव, *स्वराज त्रिभुवन*  (शिर्डी) -  नगर शहर व नगर ग्रामीण, *प्रियेश सरोदे* (जामखेड) – पाथर्डी व शेवगाव, *उत्तम पठारे* (पारनेर) – श्रीगोंदा.

प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब आणि युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा  एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष  निखिल पापडेजा यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या एनएसयूआयचे संगठन अधिक मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी काम करतील असा विश्वास जिल्हा समन्वयक किरण काळे यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी युवक कॉंग्रेस व एनएसयुआयच्या तालुकानिहाय समन्वयकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. युवक प्रदेशाध्यक्ष *सत्यजितदादा तांबे* यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांची नुकतीच ऑनलाईन बैठक पार पडली होती. यावेळी विद्यार्थी कॉग्रेसच्या संघटनात्मक कामकाजा संदर्भात आढावा घेण्यात आला होता. नव्याने नेमण्यात आलेले सहसमन्वयकांना समन्वयकांच्या समवेत लवकरात लवकर तालुका निहाय दौरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात विद्यार्थी कॉंग्रेसची फळी मजबूत करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी सहसमन्वयकांची असणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.      

नवनियुक्त सहसमन्वयकांचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, युवक काँग्रेस - एनएसयुआय समन्वयक किरण काळे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, निरीक्षक अकिल पटेल आदींनी अभिनंदन केले आहे महाविद्यालय तिथे विद्यार्थी कॉंग्रेस शाखा*

विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. युजीसीने अंतिम परीक्षेच्या बाबतीत घेतलेल्या भुमिकेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीव्र विरोध करीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते साठी युवक प्रदेशाध्यक्ष *सत्यजितदादा तांबे* यांनी *राज्यपाल भगतसिंग कोशारी* यांची राजभवनावर नुकतीच भेट घेऊन चर्चा केली होती.

विद्यार्थ्यांचे अशा प्रकारचे अनेक प्रश्न असतात. त्यांना वाचा फोडत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी *सत्यजितदादा तांबे* यांच्या नेतृत्वाखाली नगर शहर आणि  जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयामध्ये *”महाविद्यालय तिथे विद्यार्थी कॉंग्रेस शाखा”* मोहिमे अंतर्गत शाखा स्थापन केल्या जाणार आहेत. महाविद्यालये सुरु झाल्यानंतर या मोहिमेला वेग दिला जाणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

-

जाहिरात
Search
विडिओ
Recent News