पुरंदर | डाळिंबाने शेतकऱ्यांना रडविले !!


पुरंदर | डाळिंबाने शेतकऱ्यांना रडविले !!

गेल्या वर्षी अतिवृष्टीने.....यावर्षी विविध रोगांच्या प्रादुर्भावाने डाळिंब उत्पादक शेतकरी आडचणित

सासवड (प्रतिनिधी) :   राजश्री बनकर पुरंदर तालुक्‍यात गेल्या दोन  तिन वर्षी पासुन डाळिंबाच्या बागा वाढल्या आसल्याने  उत्पादन वाढले. मात्र गेल्या वर्षी अतिवृष्टीने आणि यंदा विविध रोगांच्या प्रादुर्भावाने डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात आले आहे. तर आता शेतकरी डाळिंब च्या बागा उद्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे शेतक-यांना डाळिंबाने रडवले सल्याचे चित्र दिसत आहे.

        पुरंदर मध्ये साधारण पणे धालेवाडी, कोथळे, रणमळा, भोसलेवाडी, बेलसर, निळुंज, वाळुज, मावडी क. प या गावासह २५ ते ३० गावात डाळिंबाच्या बागा घेतल्या जातात, परंतु येथील शेकतरी आसमाणी संकटांना तोंड देत आहे. कोरोणा रोगाच्या प्रादुर्भावाणे लॉक डाऊन मुळे वाहतुक करता आली नाही. त्यातच रोगाचा प्रादुर्भाव वाढला आसल्याने बागा तोडाव्यात की काय आसा विचार शेतकरी करु लागला आहे.

        फेब्रुवारी दरम्यान छाटणी केलेल्या बागांचा बहर सुरू आहे. नंतर छाटणी करून बहर धरलेल्या बागांचा हंगामा साठी साधारण पणे ऐक ते दिड महिना लागु शकतो. यावर्षी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे तर तेलकट डाग पडण्यचे प्रमाण देखील आहे. या रोगामुळे फळ गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. तर यावर्षी  करोणा रोगाचा प्रादुर्भाव आसल्याने डाळिंब खरेदी दार  हे बाजार पाडुन मागणी करीत आहेत. शेतरकरी वर्गात नाराजी आहे कारण औषध फवारणी चा खर्च तरी पदरात पाडू का नाही याची चिंंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.  

      मागील वर्षाच्या अतिवृष्टीने कहर केला व डाळींबाचे मोठे नुकसान झाले तर यावर्षी सतत ऊन-पावसाचा लपणडाव यामुळे रोगराई वातावरण पोषक होते. यावर्षी मात्र ढाकणे मागेपुढे झाल्यामुळे डाळिंबाचा बहर माघे पुढे होत आहे. शास्त्रोक्त पद्धतीने दोन झाडातील आंतर योग्य प्रमाणावर असणे अपेक्षित आहे ते अंतर योग्य प्रमाणात नसल्यास जमिनीवर जे तन उगवते त्यावर औषध फवारताना तन नाशक झाडावर उडते व त्याचा परिणाम देखील झाडावर होतो त्याचबरोबर हवा खेळती राहण्यासाठी देखील दोन झाडातील अंतर महत्वाचे ठरते.

        कृषी तज्ञांच्या सल्ल्याशिवाय झाडावर औषध फवारणी घातक ठरु शकते. त्यामुळे झाडावर फवारणी करताना कृषी तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कृषी अधिकाऱ्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कृषी सल्ला दिल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतो परंतु कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करताना दिसत नाहीत. 

       मागिल चार पाच वर्षांपूर्वी सुमारे २२०० हेक्टर वर बागा होत्या. परंतु रोगाचा प्रादुर्भाव व हवामानातील बदल अतिवृष्टी त्याचबरोबर मध्यंतरी आलेला तेल्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे निम्म्या शेतकऱ्यांच्या बागा काढून टाकण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता त्यामुळे जवळपास निम्म्या शेतकऱ्यांनी आपल्या बागा काढून टाकल्यावर आता सरासरी १४६० हेक्टर वर २९२४ लाभार्थ्यांच्या कडे डाळिंब उपलब्ध आहे. त्यातील निम्म्या क्षेत्रात तोडणी सुरू आहे.

       सध्या २० किलोच्या क्रेटला ५०० ते ६००रुपये बाजार भाव मिळत आहे च्या बाजार भावांमध्ये शेतकऱ्याचा खर्च देखील निघणार नाही. सरासरी केरला दोन ते अडीच हजार रुपये बाजार भाव असेल तरच शेतकऱ्याला परवडेल.

सध्या पुरंदर मध्ये येणारी रिमझिम पाऊस यामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो व काळा डाग पडण्याची शक्यता आहे तर बुरशी रोग वाढेल त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी 

अंकुश बरडे तालुका कृषी अधिकारी

    

   वातावरण बदलामुळे बदला मुळे काळा डाग व बुरशी रोग वाढत आहे. औषध फवरणी सातत्याने करावी लागते आहे. डाग पडलेल्या फळाला प्रति किलो ३ रुपये बाजारभाव मिळतो व मध्यम पळाला  २५ रुपये प्रति किलो बाजारभाव मिळतो आहे. तर चागल्या प्रतिचा माल ६० किलो रुपये पर्यंत बाजारभाव मिळतो आहे परंतु हा माल संपूर्ण बागात  १०% एवढाच माल मिळतो आहे. सध्या डाळींबा वर मोठे संकट आहे. खर्च हि भागत नाही.

 आशोक बनकर, प्रगतशिल शेतकरी निळुंज

             शेतकऱ्यांनी डाळिंब वर प्रकिया उद्योग उभारणे गरजेचे आहे. उद्योग उभारणी केली तर डाळिंबाला बाजर भाव चागला मिळेल....

विकास चाचर , शेतकरी मावडी

जाहिरात
Search
विडिओ
Recent News