श्रीगोंदा तालुक्यात दोन दिवसांत चौघांचा कोरोना बळी: एकूण ११ बळी: नव्याने १८ जण बाधीत.


श्रीगोंदा तालुक्यात दोन दिवसांत चौघांचा कोरोना बळी: एकूण ११ बळी: नव्याने १८ जण बाधीत.

श्रीगोंदा प्रतिनिधी दि.१०: श्रीगोंदा तालुक्यात कोरोना संक्रमण वाढतच असून कोरोना रुग्णसंख्येत स्थिर वाढ होताना दिसत आहे.दिवसेंदिवस मृत्यूंची संख्या व संक्रमित रुग्णांची वाढ होत चालल्याने तालुक्यासह प्रशासनाच्या चिंतेत पडत चालली आहे. रविवार, सोमवार या दोन दिवसात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण कोविड-१९ मृतांची संख्या ११ झाल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीगोंदा शहरातील ६५ वर्षीय महिलेचा नगर येथे उपचार घेताना मृत्यु झाला तर मढेवडगाव येथील ६८ वर्षीय व काष्टी येथील ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू अनुक्रमे पुणे व दौंड येथे उपचार घेताना झाला. तर तरडगव्हाण येथील ५८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना झाला. तालुक्यातील मृत्युंची संख्या ११ वर पोहचली आहे. 

           सोमवारी तालुक्यात ८८ रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या त्यात एकुण १८ रुग्णांची वाढ झाली. श्रीगोंदा शहरात चांभार गल्ली-२,पंचायत समीती समोर १,तर ग्रामीण भागात जंगलेवाडी-११,येवती-१,वलघुड-२,कुंजीरवाडी-१ अशी रुग्ण वाढ झाली आहे. तालुक्यात एकूण रुग्णसंख्या ४०८ इतकी झाली असुन सध्या ७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ३२५ रुग्णांनी कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर ११ जणांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News