श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अखेर स.पो.नि. देवकाते दौलतराव जाधवांच्या शरण


श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अखेर स.पो.नि. देवकाते दौलतराव जाधवांच्या शरण

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी:

पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्ह्यातील मुंबई पोलीस दलातील सहाययक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते अखेर २औ६दिवसानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शरण आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली

जाधव म्हणाले १४जुलै २०२० रोजी देवकाते याची पत्नी अमिता देवकाते हिने थिटे सांगवी येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती या प्रकरणी मयताचे वडील कैला कोकरे रा.पारोडी ता.शिरूर यांनी पांडुरंग देवकाते याचे विवाहबाह्य संभधाला मयताने विरोध केल्याने तिला शारीरिक,मानसिक छळ केला तसेच माहेरून हुंडा आणण्यासाठी पती पांडुरंग,सासरा नामे ज्ञानदेव देवकाते,सासू संध्या देवकाते,दिर गणेश यांनी छळ केल्याची तक्रार दिल्यावर पोलिसांनी पती,सासरा,सासू,दिरा विरुद्ध गुन्हा दाखल केला तदनंतर सर्वांनी घर सोडून पोबारा केला गुन्ह्याचे गांभीर्य आणि पती पोलीस दलात असल्याने पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी लक्ष घातले सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे,स पो नि सतिश गावित,गुन्हे प्रकटिकरणचे स पो नि राजेंद्र सानप यांचे पथक विविध जिल्ह्यात पाठविले सर्व नातेवाईक,नजीकच्या सहकाऱ्यांकडे शोध घेतला मात्र पांडुरंग देवकाते हा सतत आश्रय व नंबर बदलत असल्याने शोधणे जिकरीचे बनले अखेर पांडुरंगचा भाऊ गणेश व वडिल ज्ञानदेव देवकाते स्वारगेट परिसरात असल्याचा सुगावा स पो नि निलेश कांबळे यांच्या पथकाला मिळताच ७ऑगस्ट रोजी दोघांना ताब्यात घेण्यात आले पोलीस पथक मागावर असल्याने व आश्रय मिळत नसल्याचे पाहून पांडुरंग देवकाते १०ऑगस्ट रोजी शरण आला त्यास अटक करण्यात आल्याचे सांगून जाधव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे सांगितले 

या तपास कामी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील,उपअधीक्षक संजय सातव,पो नि दौलतराव जाधव  तिन्ही पथक प्रमुख पोलीस कर्मचारी संजय काळे वैराळ,घोळवे,देवकाते,भापकर,इंगवले,टाके,राठोड आदींनी सहभाग घेतला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News