दौंड येथील SRPF क्र 5 येथे सीएन जी पंपाचे समादेशक तानाजी चिखले यांच्या हस्ते उद्घाटन


दौंड येथील SRPF क्र 5 येथे सीएन जी पंपाचे समादेशक तानाजी चिखले यांच्या हस्ते उद्घाटन

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहरात पेट्रोल डिझेल वेळेत मिळत होते परंतू सी एन जी सुविधा उपलब्ध नव्हती,ती सुविधा SRPF गट 5 चे समादेशक  श्री तानाजी चिखले यांनी दौंड करांसा ठी उपलब्ध करून दिली आहे,या पूर्वी सी एन जी सुविधा दौंड तालुक्यातील सोलापूर पुणे हायवे वर चौफुल्याच्या पुढे दौंड पासून 30 किलोमीटर अंतरावर होते,परंतु दौंडकर नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे, दौंड शहरातील SRPF गट  5 येथील पेट्रोल पंपावर ही सुविधा सुरू झाली आहे, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड येथील सीएनजी पंपाचे उद्घाटन समादेशक तानाजी चिखले  यांच्या शुभहस्ते झाले आहे,यावेळी समादेशक तानाजी चिखले यांनी दौंडच्या जनतेला सी एन जी चा उपयोग करून घेण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News