अटीतटीच्या लढाईत माजी आमदार राहुल जगताप यांनी मारली बाजी


अटीतटीच्या लढाईत माजी आमदार राहुल जगताप यांनी मारली बाजी

श्रीगोंदा अंकुश तुपे(प्रतिनिधी):

सर्वांचे लक्ष लागलेल्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी माजी आमदार राहूल जगताप गटाचे संजय जामदार तर उपसभापती पदी संजय म्हंडुळे यांची अटीतटीच्या लढतीत वर्णी लागली जामदार यांना १० आमदार बबनराव पाचपुते गटाचे लक्ष्मण नलगे यांना ७  तर मीनाताई आढाव यांना१ मते मिळाली तर उपसभापती पदासाठी संजय म्हंडुळे यांना १०तर मावळते उपसभापती वैभव पाचपुते यांना ८मते मिळाली आमदार पाचपुते व राजेंद्र नागवडे एकत्र असताना पाचपुते गटाचे २संचालक फुटल्याने जगताप गटाने बाजी मारली,सकाळी ११वाजता सहायक निबांधक रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली

पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,स पो नि राजेंद्र सानप,स फौ गायकवाड आदींनी चोख बंदोबस्त ठेवला

हा निकाल पाचपुते गटाला अनपेक्षित असा मानला जातो या निवडी मुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत आगामी जिल्हा बँक,नागवडे व कुकडी साखर कारखाना निवडणुकीचा हा "ट्रेलर"समजला जातो

जाहिरात
Search
विडिओ
Recent News