दोनच दिवसात तीन चोऱ्यांचा तपास: तीन दरोडेखोर ताब्यात:२ लाख ३३ हजाराचा मुद्देमाल ताब्यात.


दोनच दिवसात तीन चोऱ्यांचा तपास: तीन दरोडेखोर ताब्यात:२ लाख ३३ हजाराचा मुद्देमाल ताब्यात.

श्रीगोदा अंकुश तुपे प्रतिनिधी: श्रीगोदा पोलिसांनी आढळगाव येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावत जबरी चोरी, खून, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथील महेंद्र गंडीशा काळे व  त्याचे साथीदार नितीन पीचारु काळे, सचिन पीचारु काळे या तिघा आरोपींना दि.९ रोजी रात्रीच्या सुमारास अटक करून विविध ठिकाणी केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील ७८ हजार रुपये किंमतीचे सोन्या, चांदीचे दागिने, ३ दुचाकी, चाकू, तलवार, हेक्झा ब्लेड, कटावणी, असा एकूण २ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चोरीच्या घटना घडताच हिस्ट्री सीटर्स शोधण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यावर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव भर देत असल्याने  चोरी,घरफोडी,दरोड्यातील आरोपी मुद्देमाल सह मिळत आहे,कालच्या कोंबिंग ऑपरेशन मध्येही विविध पोलीस ठाण्यात"  वॉन्टेड"आरोपी सापडले

         ७ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव शिवारात दोन ठिकाणी व टाकळी लोणार येथे झालेल्या जबरी चोरीत सोन्या चांदीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या चोरीबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्या नंतर श्रीगोंदा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.  रविवारी  श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरणं शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मुख्य पोलीस हवालदार अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे,संजय काळे, गोकुळ इंगवले,योगेश सुपेकर,दादा टाके यांनी कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथे कोंबिंग ऑपरेशन करून महेंद्र गंडीशा काळे व त्याचे साथीदार नितीन पीचारु काळे, सचिन पीचारु काळे या तिघा आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.

      अधिक चौकशी करून त्यांच्याकडून श्रीगोंदा कर्जत, बारामती येथील घडलेल्या गुन्ह्यामधील एकूण २ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यातील महेंद्र काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात श्रीगोदा कर्जत, जामखेड, दौंड या पोलीस स्टेशनमध्ये खून, दरोडा, जबरी चोरी यासारख्या विविध १२ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे तर उर्वरित दोन आरोपींविरोधात सुद्धा अकोले, दौंड, कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. केलेली कारवाई पोलिस अधीक्षक अखिलेश कुमारसिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, कर्जत विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News