लष्कराला जमीन देण्यास इसळक व निंबळक ग्रामस्थांचा विरोध!! लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून बेघरांचा प्रकल्प उभारण्यासंदर्भात मंगळवारी ग्रामस्थांसह बैठक


लष्कराला जमीन देण्यास इसळक व निंबळक ग्रामस्थांचा विरोध!!  लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून बेघरांचा प्रकल्प उभारण्यासंदर्भात मंगळवारी ग्रामस्थांसह बैठक

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) इसळक व निंबळक (ता. नगर) येथील ग्रामस्थ श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंगळवार दि.11 ऑगस्ट रोजी वृक्षरोपण अभियान राबविणार आहेत. तसेच लष्कराला जमीन देण्यास इसळक व निंबळक ग्रामस्थांचा विरोध असून, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने येथील खडकाळ जमीनीवर लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प उभारण्यासंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा होणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

निंबळकचे सरपंच विलास लामखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. इसळक व निंबळक येथील जमीन के.के. रेंजसाठी लष्कर ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत सदरील जमीन लष्काराला देण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. निंबळक, इसळक शिवारात मोठ्या प्रमाणात खडकाळ जमीन पडून आहे. हायब्रीड लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून घरे होण्यासाठी सुमारे 120 एकर जमीन देण्यासाठी शेतकरी तयार झाले आहेत. या परिसरात सुमारे तीनशे एकर पड जमीन मिळून शहरातील 20 हजार घरकुल वंचितांचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. शासनाने लॅण्ड पुलिंग व संयुक्त भागीदारी धोरण स्विराले असताना, शेतकरी देखील आपल्या पड जागा देण्यास तयार झाले आहे. जागा नसल्याने पंतप्रधान आवास योजना रखडली होती. जागेचा प्रश्‍न सुटल्याने घरकुले होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लॅण्ड पुलिंगद्वारे घरकुल वंचितांना बाजारभावाच्या निम्म्या किंमतीत घरे मिळणार आहे. तर जागा देणार्‍या शेतकर्‍यांना 35 टक्के बांधलेली घरे दिलेल्या जागेच्या प्रमाणात परतावा म्हणून मिळणार असल्याने त्यांचा देखील मोठा फायदा होणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या बैठकीसाठी कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, अ‍ॅड. लक्ष्मणराव पोकळे, ओम कदम, प्रकाश थोरात, विठ्ठल सुरम आदि प्रयत्नशील आहेत.   

जाहिरात
Search
विडिओ
Recent News