समाजसेवा करत आपले कुटुंब आदर्शपणे सांभाळणारे "भाई" दीपस्तंभासारखेच - डॉ. एम. के. इनामदार -


समाजसेवा करत आपले कुटुंब आदर्शपणे सांभाळणारे "भाई" दीपस्तंभासारखेच - डॉ. एम. के. इनामदार -

गोकुळदास (भाई) शहा यांच्या "भाई आणि आम्ही " या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न 

इंदापूर काकासाहेब मांढरे  प्रतिनिधी : 

मानवी जीवन जगत असताना विचारांची जडणघडण आवश्यक आहे. मात्र चांगल्या विचाराची कधीही फारकत न घेता समाजसेवा करत आपले कुटुंब आदर्शपणे सांभाळणारे व्यक्तिमत्व हे आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभ म्हणून आदर्श आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी येथे केले. 

                 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गोकुळदास (भाई) शहा यांच्या "भाई आणि आम्ही" या पुस्तक प्रकाशन सोहळा निमित्त कार्यक्रमात घेण्यात आला, त्यावेळी  डॉ. एम. के. इनामदार बोलत होते. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले असून गोकुळदास (भाई) शहा यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त एका छोटेखानी समारंभामध्ये डॉ.एम. के. इनामदार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News