फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी करुन आर्सेनिक 30 गोळ्यांचे वितरण


फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी करुन आर्सेनिक 30 गोळ्यांचे वितरण

फिनिक्स फौंडेशनच्यावतीने नागरदेवळे येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कोरोनाची तपासणी करुन आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आनंदऋषीजी हॉस्पिटलचे डॉ.राहुल बोडखे, मिश्रीलाल पटवा, फिनिक्सचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, राम पानमळकर आदि.

कोरोनाविषयी नागरिकांमध्ये जागृती होणे महत्वाचे- जालिंदर बोरुडे

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) सध्या कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना योग्य माहिती व त्यापासून घ्यावयाची काळजी या विषयी जनजागृती होणे महत्वाचे आहे. याच हेतूने फिनिक्स फौंडेशनच्यावतीने नागरदेवळे पंचक्रोशितील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करुन रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वितरण केले आहे. नागरिकांनीही भिती न बाळगता स्वत:च्या स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर, मास्कचा वापर केला पाहिजे. शासनाच्या नियमांचे पालन केल्यास या रोगावर आपण निश्चित मात करु शकतो. नेत्र तपासणी शिबीर दर महिन्यांच्या 10 तारखेला सुरु असून, याही परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याचे काम फिनिक्सच्यावतीने सुरु असल्याचे प्रतिपादन फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले. 

फिनिक्स फौंडेशनच्यावतीने नागरदेवळे येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रामस्थांसह पंचक्रोशितील मोफत कोरोनाची तपासणी करुन आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आनंदऋषीजी हॉस्पिटलचे डॉ.राहुल बोडखे, मिश्रीलाल पटवा, फिनिक्सचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, राम पानमळकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.राहुल बोडखे म्हणाले, फिनिक्स फौंडेशनच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी शिबीराच्या माध्यमातून गोर-गरीबांना आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम दिशा दर्शक आहे. आज नागरिकांनीही कोरोनापासून बचाव करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे, असे सांगून फिनिक्स फौंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. 

सूत्रसंचालन मोहिनीराज कोल्हे यांनी केले तर शेवटी गौरव बोरुडे यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News