नगर (प्रतिनिधी संजय सावंत - तालुक्यातील चास येथील चारशे वर्ष जुने ऐतिहासिक नृसिंह मंदिर दगडी बांधकामाचे आकर्षक असून, ते भाविक पर्यटकांना आकर्षित करणारे आहे, त्यामुळे तेथे उपासना आणि फलश्रृतीचा अनुभव प्राप्त आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी प्रल्हाद देव यांनी दिली. मठ-मंदिर नगर जिल्हा समितीच्यावतीने या मंदिराला भगवा ध्वज व स्मरणिका प्रदान कार्यक्रमप्रसंगी श्री.देव बोलत होते.
सध्या मंदिर बंद असल्याने मंदिरासमोर सोशल डिस्टसिंग पाळून यावेळी आरती करण्यात आली. उपासनेबरोबर स्थानिकांना हक्काचा रोजगाराची संधी पर्यटकांच्या ओघ सुरु झाला तर होईल, त्यादृष्टीने समिती कार्यरत आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी मठ-मंदिर समिती प्रमुख हरिभाऊ डोळसे, काँग्रेसचे नगर शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, आर.आर.खंडेलवाल, कैलास खंडेलवाल, प्रफुल्ल खंडेलवाल, सतिष खंडेलवाल, विनोद झालानी, प्रसाद देव, सौ.संतोषी झालानी, सौ.जयश्री झालानी, प्रसाद देव, अॅड.ज्ञानेश देव, सौ.सुभद्रा देव आदि उपस्थित होते. सुधीर झालानी यांनी उपस्थितांना प्रसाद म्हणून अल्पोहार दिला तर हनुमान विशेषांकाचे वाटप करण्यात आले. चास येथील नृसिंह मंदिराला जिल्हा मठ-मंदिर समितीच्यावतीने भगवा ध्वज व स्मरणिका प्रदान करतांना समिती प्रमुख हरिभाऊ डोळसे. समवेत मंदिराचे पुजारी प्रल्हाद देव, बाळासाहेब भुजबळ, सुधीर झालानी, कैलास खंडेलवाल, विनोद झालानी आदि.