श्रीगोंदा पोलिसांची वाळू चोरांवर धडाकेबाज कारवाई: मध्यरात्री छापा टाकून २७ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त.


श्रीगोंदा पोलिसांची वाळू चोरांवर धडाकेबाज कारवाई: मध्यरात्री छापा टाकून २७ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त.

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी: श्रीगोंदा पोलिसांनी दि.९ रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वांगदरी ता. श्रीगोंदा येथील डोमाळवाडीजवळ घोडनदी पात्रात छापा टाकून अवैधरीत्या वाळूचोरी करणारे तीन ट्रक व चार ब्रास वाळू असा एकूण २७ लाख १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

      पोलीस हवालदार अमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून ट्रक एम एच १२डिटी ९९८१ याचा चालक मालक बालाजी सखाराम केंद्रे रा. चंदननगर जि.पुणे.ट्रक क्रं- एम एच ४२ बी ९२६० वरील चालक-मालक, ट्रक क्रं-एम एच १६,एई ७३७७ वरील चालक-मालक यांच्याविरोधात विनापरवाना बेकायदा अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाळू चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस हवालदार अमोल आजबे,प्रताप देवकाते,कुलदीप घोळवे,गोकुळ इंगवले यांच्या  पथकाने केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार भानुदास नवले करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News