क्रांतिदिनी निमगाव वाघात वृक्षरोपण वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत क्रांति घडविण्याचे आवाहन


क्रांतिदिनी निमगाव वाघात वृक्षरोपण वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत क्रांति घडविण्याचे आवाहन

अहमदनगर संजय सावंत(प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने क्रांतिदिनी निमगाव वाघा (ता. नगर) येथील सार्वजनिक व्यायाम शाळेच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. या वृक्षरोपण अभियानाद्वारे पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत क्रांति घडविण्याचे ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले.

माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षरोपणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. निसर्ग, पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सैनिक सचिन शिंदे, अंकुश शिंदे, बाळू फलके, पै.अनिल डोंगरे, जालिंदर आतकर, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, विकास निकम, गणेश फलके, अतुल डोंगरे, सोमनाथ आतकर, अरुण कापसे, किरण जाधव, शंकर कापसे, ज्ञानेश्‍वर जाधव आदि उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन खर्‍या अर्थाने क्रांति घडविण्याची वेळ आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन मोलाचे असून समाजातील सर्व घटकांना वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत सदैव जागृक असणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याची जोपासना करण्याचे आवाहन पै.नाना डोंगरे यांनी केले. संदिप डोंगरे यांनी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षणास आज अनन्यसाधारण महत्त्व असून संपूर्ण समाजाने पर्यावरण रक्षणार्थ पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले. संस्थेच्या माध्यमातून डोंगरे संपुर्ण जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी स्वखर्चाने वृक्षरोपण, बीजरोपणाचे घेत असलेल्या कार्यक्रमाचे माजी सैनिक सचिन शिंदे यांनी विशेष कौतुक केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News