दापोडीत प्रेरणादायी क्रांतीस्थळ विकसित करावे.....सचिन साठे क्रांतीदिनानिमित्त कॉंग्रेसच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन


दापोडीत प्रेरणादायी क्रांतीस्थळ विकसित करावे.....सचिन साठे  क्रांतीदिनानिमित्त कॉंग्रेसच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन

विट्ठल होले पुणे

पिंपरी (दि. 9 ऑगस्ट 2020) हुतात्मा सरदार भगतसिंह, हुतात्मा नारायण दाभाडे आणि हुतात्मा राजगुरु यांचे बलिदान सर्व भारतीयांना प्रेरणादायी व स्फुर्तीदायी आहे. या हुतात्म्यांनी तरुणपणीच स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात बलिदान दिले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात युवकांचे मोठे योगदान आहे. या हुतात्म्यांचा इतिहास भावीपिढीला समजावा यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दापोडी येथे शहराच्या प्रवेशव्दाराजवळ ‘क्रांतीस्थळ’ विकसित करावे. यामध्ये तीनही हुतात्म्यांचे पुर्णाकृती पुतळे व समुहशिल्प उभारावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

      रविवारी, 9 ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते दापोडी येथील हुतात्मा सरदार भगतसिंह आणि हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, शहर सरचिटणीस भाऊसाहेब मुगूटमल, हिरामण खवळे, सुनिल राऊत, प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस मयूर जयस्वाल, सोशल मिडीया सेल शहराध्यक्ष चंद्रशेखर जाधव, कुंदन कसबे, गौरव चौधरी, संदेश बोर्डे आदी उपस्थित होते.

        यावेळी सचिन साठे म्हणाले की, सहा वर्षांपुर्वी लोकसभा निवडणूकीत भाजपाने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बेरोजगार युवकांना दरवर्षी एक कोटी रोजगार निर्माण करु असे आश्वासन देऊन मतांचा जोगवा मागीतला होता. प्रत्यक्षात मात्र केंद्र सरकार रोजगार निर्मितीबाबत उदासीन आहे. कोरोना काळात वीस लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. आजपर्यंत मात्र युवकांच्या हातात वीस रुपये देखील सरकारकडून मिळाले नाहीत. उलट शेकडो कंपन्या बंद होत असून लाखो नागरीक बेरोजगार झाले आहेत. अशा कृतीशून्य सरकारला आता युवकांनी प्रश्न विचारले पाहिजेत असेही सचिन साठे म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News