पिक संरक्षक औषधे व त्यांचे वर्गीकरण !! बांधावरची शेतीशाळा या सदरात


पिक संरक्षक औषधे व त्यांचे वर्गीकरण !! बांधावरची शेतीशाळा या सदरात

संकलन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

           🌻   बांधावरची शेतीशाळा  🌻

नमस्कार मित्रांनो

बांधावरची शेतीशाळा या सदरात आज आपण पिक संरक्षक औषधे कीटकनाशके यांचे वर्गीकरण पाहणार आहोत.

 1 शेतकरी बंधू विविध प्रकारचे रासायनिक कीटकनाशकांची खरेदी करत असतो त्याला कोणते कीटकनाशक खरेदी करावी कोणत्या कधी साठी कोणते कीटकनाशक आपण खरेदी केले पाहिजे याबाबत ज्ञान नसते या किटकनाशकांची वर्गीकरण आपल्याला माहित नसते त्यामुळे बराच वेळ झाला त्या पिकाच्या लेबल नसलेली कीटकनाशके शेतकरी बंधू खरेदी करतात व मग आपल्याला रिझल्ट मिळत नाही म्हणूनच या सदरामध्ये कीटकनाशकांचे त्यांच्या किटकांच्या परिणाम करण्याच्या पद्धतीवरून खालील प्रमाणे वर्गीकरण केले केले जाते यामध्ये    1 *पोट विष कीटकनाशक*  जेव्हा कीटक अशा प्रकारचे विषय आपल्या खाद्य बरोबर खातात त्याच्या पोटातून ते शरीरात शोषली जातात व आपल्या परिणाम दाखवत जॅ कीडीकुरतडून खातात त्यावेळी अशा कीटकनाशकांचा परिणाम दिसून येतो उदाहरणार्थ पाने कुरतडणाऱ्या पाने खाणाऱ्या अळिआहे यामध्ये परिणामकारक दिसून येतात.                     

2 *स्पर्शजन्य विष कीटकनाशक* या प्रकारामध्ये रासायनिक औषध कीटकांच्या त्वचेतून आगरशरीराच्या खालच्या बाजूस बाजूने असणाऱ्या श्वसन संस्थेच्या छिद्रातून शरीरामध्ये प्रवेश करतात व आपल्या परिणाम दाखवतात चांगल्या परिणामांसाठी ही कीटकनाशके वनस्पतीच्या पृष्ठभागावर किंवा कीटकांच्या शरीरात असतील अशा दृष्टीने फवारावे यामध्ये रस शोषण व कुरतडून खाणाऱ्या किंवा मऊ त्वचेच्या किडींना उपयुक्त ठरतात मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी साठी उपयुक्त ठरते उदाहरणार्थ कार्बरील.                               

3 *आंतरप्रवाही विषजन्य* कीटकनाशक या प्रकारामध्ये कीटकनाशके वनस्पतीवर फवारली जातात किंवा जमिनीतून दिली जातात किंवा बियाणाला चोळले जातात व रसावाटे सर्व कीटकांच्या शरीरातपसरले जातात कीटक हा रस शोषतात व झाडाचे अवयव खाल्ले जातात तेव्हा त्यांना विषबाधा होते शक्ती देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे यामध्ये मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी बहुतांश उपद्रवी कीटकांना आंतरप्रवाही कीटकनाशके फायद्याची ठरतात उदाहरणार्थ डायमिथोएट.                          4 *धुरीजन्य कीटकनाशके* या प्रकारामध्ये कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी रसायने वायुरूपात किंवा धुरीच्या स्वरूपात वापरली जातात तिकिटांच्या श्वासोच्छवासचेमाध्यमातून छीद्रात द्वारे शरीरात प्रवेश करतात व परिणाम दाखवतातही कीटकनाशके बहुतांश औषध पावडर स्वरूपात दाबा भर दाबाखाली भरलेल्या वायू किंवा पातळ द्रावण अशा स्वरूपात उपलब्ध असतातमात्र फवारणी करताना या औषधाचे वायूत रूपांतर होते उदाहरणार्थ सरपटणाऱ्या उंदीर  तर कीड सूत्रकृमी यासारख्या धुरीजन्य कीटकनाशकाचे चांगले परिणाम दिसून येतात 

उदाहरणार्थ कार्बन डाय सल्फाइडहे मुख्य चार प्रकारात वर्गीकरण केले जाते ते सर्वसमावेशक नाही परंतु सर्वसामान्य आता याचे चार मुख्य प्रकार वरून कोणत्या किडीसाठी कोणत्या प्रकारचे कीटकनाशक यासंदर्भात आपल्याला अंदाज येतो कीटकनाशकाचे बाटलीवर या मुख्य प्रकारांचा स्पष्ट स्वरूपात उल्लेख केलेला असतो या लेखाच्या भाग दोन मध्ये रासायनिक स्वरूपावरून किटकनाशके चे वर्गीकरण आपण पाहणार आहोत सध्या महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग राबवत असलेले कीटकनाशक फवारणी करणारे शेतकरी व कौशल्य मजूर या सर्वांसाठी या लेखाच्या माध्यमातून निश्चितच फायद्याचे ठरेल.

सहकार्य -निलेश बिबवे शेतीशाळा प्रशिक्षक, कृषी सहाय्यक,कृषी विभाग कोपरगाव

जाहिरात
Search
विडिओ
Recent News