साईनाथ हॉस्पिटल शिर्डी येथील परीचारीका गायत्री बढे यांचा डाउच खुर्द येथे सत्कार !!


साईनाथ हॉस्पिटल शिर्डी येथील परीचारीका गायत्री बढे यांचा डाउच खुर्द येथे सत्कार !!

 कोपरगाव, संजय भारती प्रतिनिधी:

 कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द गावात लोकनियुक सरपंच संजय गुरसळ यांच्या हस्ते शिर्डी येथे आरोग्य विभागात आरोग्य सेविका या पदावर कार्यरत असलेल्या गायत्री देवीदास बढे यांचा सत्कार करण्यात आला.

 गायत्री बढे या साईनाथ हाॅस्पीटल शिर्डी येथे परीचारीका या पदावर कार्यरत आहेत.त्यांनी आठ दिवस कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णाची सेवा केली असुन आता त्या आपल्या डाऊच गावात परत आल्या आहे.

 या पाश्र्वभुमीवर डाऊच खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी लोकनियुक सरपंच संजय गुरसळ म्हणाले की रूग्णांची सेवा करणारे डाॅक्टर नर्स,पोलिस, सफाई कामगार,हे देवदुतच आहे. हेच खरे कोरोना योध्दा असल्याचे त्यांनी सांगीतले

 यावेळी क्षत्रिय धनगर समाज सेवा संघटनेचे टिक्कल सर युवा तालुका अध्यक्ष किरण भाऊ थोरात तसेच आमच्या गावचे मार्गदर्शक बाळासाहेब बढे, दिगंबर पवार,चंद्रकांत गुरसळ, देविदास बढे ,बाबासाहेब बढे, रवींद्र बढे,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News