बोल्हेगावच्या पोलीस कॉलनीत नागरी सुविधांचा बोजवारा क्रांतिदिनी नागरिकांचा सुर्यनामा आक्रोश आंदोलन


बोल्हेगावच्या पोलीस कॉलनीत नागरी सुविधांचा बोजवारा  क्रांतिदिनी नागरिकांचा सुर्यनामा आक्रोश आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) बोल्हेगाव उपनगरला नागरी सुविधांचा बट्टयाबोळ झालेला असताना, या भागातील पोलीस कॉलनी मधील नागरिकांनी फक्त करवसुलीला प्राधान्य देणार्‍या महापालिकेचा निषेध नोंदवून नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी सुर्यनामा आक्रोश आंदोलन करण्यात आले. क्रांतिदिनी भारतीय जनसंसद, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन व पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या आंदोलनात अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, दादासाहेब नेटके, शितल जाधव, प्रतिक्षा नेटके, पूनम चव्हाण, वर्षा चव्हाण, मंदाकिनी कांबळे, आशा नेटके, संतोष जाधव, वसंत जाधव, सौज्ञावती राजगुरु, उदयसिंग वाणी, अनिकेत चव्हाण आदि सहभागी झाले होते.

उघड्या गटारीत टक्केवारीचा दगड व टोलवाटोलवीची प्रतिकात्मक वीट विसर्जित

फक्त करवसुलीला प्राधान्य देऊन महापालिकेत टक्केवारी व टोलवाटोलवीत लोकप्रतिनिधी व अधिकारी मग्न असल्याचा आरोप करुन आंदोलनकर्त्यांनी उघड्या गटारीत टक्केवारीचा दगड व टोलवाटोलवीची प्रतिकात्मक वीट विसर्जित केली. तर क्रांतिदिनी टक्केवारी व टोलवाटोलवीला चले जावची घोषणा दिली.  महापालिकेत बोल्हेगावचा समावेश झाल्यानंतर महापालिकेने या उपनगराकडे दुर्लक्ष केले. या भागाचा प्राथमिक सुविधांचा विकास अद्यापि झालेला नाही. महापालिकेला शहराच्या अमृतपाणी योजना (फेज 2) व भूयारी गटारीसाठी मोठा निधी आला. मात्र हा निधी टक्केवारी व टोलवाटोलवीत लुटण्यात आला. शहरातील ही प्रस्तावित कामे झाली नाही. तर अमृतपाणी योजनेच्या ठेकेदाराने पळ काढला. जीआयसी योजनेतंर्गत पंधरा वर्षापुर्वी बोल्हेगावला पोलीस वसाहत उभारण्यात आली. ठेकेदाराने कर्ज मंजूर करुन घरकुल लाभार्थींचे पैसे खाल्ले. लाभार्थींच्या बँक खात्यातून अजूनही पैसे कापले जात आहे. या भागात 120 घरांची कॉलनी असून, नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. अनेक वर्षापासून येथे पाणी, रस्ते व ड्रेनेजलाईनची समस्या आहे. या भागात पोलीस मोठ्या संख्येने राहतात. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ड्रेनेजलाईन नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. तातडीने महापालिकेने लक्ष घालून बोल्हेगाव उपनगरातील पोलीस कॉलनीत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News