छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने कर्नाटक सरकारचा निषेध करुन पुतळा दहन


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने कर्नाटक सरकारचा निषेध करुन पुतळा दहन

नगर -(प्रतिनिधी  संजय सावंत) कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीतून काढला. त्याच्या निषेधनार्थ नगर शहर शिवसेनेच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा येथे कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करुन कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल बोरुडे, जि.प.सदस्य संदेश कार्ले, राजेंद्र भगत, संजय शेंडगे, दत्ता जाधव, शाम नळकांडे, विजय पठारे, रमेश परतानी, परेश लोखंडे, प्रशांत गायकवाड, आनंद लहामगे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, विशाल वालकर आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे दैवत आहेत. शिवरायांचा अवमान हा लोकभावनेचा अवमान आहे. या घटनेमुळे समस्त जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. कर्नाटक सरकारने माफी मागावी व पुतळा पुर्ववत बसवावा, अशी मागणी आम्ही करता आहोत. अशी तुघलकी कारवाई करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही.


     याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हेतर देशावासीयांचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांचा अवमान करणे म्हणजे जनतेच्या भावना दुखाविणे आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण जगात आदराचे स्थान आहे, त्या शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटवून देशद्रोह केला आहे, त्यामुळे या मागे असणार्‍यांना कडक शासन झाले पाहिजे. शिवसेना अशा घटनेचा निषेध करुन संबंधितांवर कारवाईची मागणी करत आहे. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच यात सहभागी असणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी उपस्थितांनी मागणी केली

- कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीतून काढण्यात आल्याच्या निषेधनार्थ नगर शहर शिवसेनेच्यावतीने  कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करुन प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल बोरुडे, जि.प.सदस्य संदेश कार्ले, राजेंद्र भगत, संजय शेंडगे, दत्ता जाधव, शाम नळकांडे, विजय पठारे, रमेश परतानी, परेश लोखंडे, प्रशांत गायकवाड, आनंद लहामगे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, विशाल वालकर आदि. (छाया : राजु खरपुडे)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News