मोक्का गुन्ह्यातील फरार कुख्यात गुंड शुभम गोळेला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, एक गावठी पिस्टल व दोन राउंड जप्त


मोक्का गुन्ह्यातील फरार कुख्यात गुंड शुभम गोळेला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, एक गावठी पिस्टल व दोन राउंड जप्त

विट्ठल होले पुणे

पुणे --- दि.28/02/2020 रोजी पिरंगुट गावचे हद्दीत शुभम गोळे याचे सांगणे वरून अनोळखी तीन इसमानी येऊन गुप्तीचा धाक दाखवून जबरदस्ततीने गाडीसह लवळे गावाकडे जाणारे टी आर डब्लू कंपनीचे शेजारी मोकळे जागेत नेवून तिथे अगोदर थांबून  असलेले आरोपीचे साथीदारांसह आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देउन 15000 रू ची खंडणी मागितली व ती न दिल्याने शुभम गोळे यांची माणसे फिर्यादीच्या माणसांना गाडीसह अज्ञात ठिकाणी घेऊन गेले आहेत व पैसे नाही दिले तर जिवंत सोडणार नाही  अशी धमकी देवून ताब्यातील असणारा 41,000 /- माल जबरदस्तीने काढून घेऊन गेले होते त्यावरून *पौड पो.स्टे ला 84/2020 भा. द.वी.365,386,395* प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात मोक्का कायद्याअन्वये पुढील तपास हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील या करीत आहेत,

         *सदर आरोपी शुभम गोळे याचेवर यापूर्वीे खून,खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गंभीर दुखापत,गर्दी मारामारी ,अवैधरित्या शस्त्र बाळगणे या सदराखालील एकूण 19 गुन्हे दाखल असून ,आरोपी हा सराईत असल्यामुळे आरोपीवर  *महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999कलम 3,(1)(II),3(4)* यापूर्वी सुद्धा कारवाई करण्यात आलीे होती व तो त्यामध्ये 4 वर्ष येरवडा कारागृहात होता व तो जामिनावर आल्यावर पुन्हा एकदा वरील सदर गुन्हा  त्याने केला होता व या गुन्ह्या सह त्याच्यावर मोक्का मंजूर झाल्यापासून तो फरार होता.

        सदर आरोपी हा सराईत असल्यामुळे गुन्हा घडल्यापासून फरार होता, त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक त्याचा समांतर शोध घेत असताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे *शुभम संभाजी गोळे वय 24 रा. गोळेअळी पिरंगुट ता. मुळशी जि. पुणे* हा हजारमाची ता.कराड जि. सातारा  येथे येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाले होते त्या अनुषंगाने  सातारा जिल्ह्यामध्ये  कराड येथील  हजारमाची येथे सापळा लावून  शितापीने आरोपी ताब्यात घेतले आहे.सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पौड पो.स्टे येथे हजर केले आहे.

सदरची कामगिरी ही *मा.व.पो.नि.पद्माकर घनवट याचे मार्गदर्शना खाली पोसई अमोल गोरे,रामेश्वर धोंडगे, सहा.फौ दत्तात्रय जगताप, पो हवा राजेंद्र चदनशिव, पो ना राजू मोमीन, चंद्रकांत जाधव,विजय कांचन, पो.शि.अमोल शेडगे,मंगेश भगत,बाळासाहेब खडके, धीरज जाधव,दगडू वीरकर, समाधान नाईकनवरे* यांनी केली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News