शनिवारी श्रीगोंदा तालुक्यात २१ जण पॉझिटिव्ह: श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कोरोनाचा प्रवेश.


शनिवारी श्रीगोंदा तालुक्यात २१ जण पॉझिटिव्ह: श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कोरोनाचा प्रवेश.

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी:

 दि. श्रीगोंदा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या लाटेला ओहोटीची चिन्हे दिसत नाहीत. शनिवारी घेतलेल्या १४८ रॅपिड अँटीजन चाचण्यांमध्ये २१ रुग्ण संक्रमित सापडले. त्यात श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व एका कर्मचाऱ्याला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.गेली चार महिने कोरोनाला दूर ठेवण्यासाठी व नागरिकांना शिस्त लावणाऱ्या पोलिसांनाच लागण झाल्याने  पोलीस कर्मचाऱ्यांच्यात खळबळ उडाली आहे.

             संसर्ग झालेले अधिकारी व त्यांचा सहाय्यक हे काही दिवसांपूर्वी नगर-पुणे चेक पोस्टवर ड्युटीवर होते. तिथेच त्यांना संसर्ग झाल्याचा संशय आहे. किरकोळ आजारी असल्याने अधिकारी यांनी खाजगी दवाखान्यात उपचार सुरू केले होते परंतु शंका आल्याने त्यांनी व कर्मचाऱ्याने रॅपिड टेस्ट घेतली असता ते पॉझिटिव्ह सापडले.

        तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा ३७२ झाला आहे.तर आतापर्यंत २८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीतीला ८७ जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत.दिलासादायक म्हणजे शनिवारी ३९ जण बरे होऊन घरी परतले. तर आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

       श्रीगोंदा शहरात दि.८रोजी  ३ रुग्ण सापडले. माळीनगर-२, बालाजीनगर येथे १ रुग्ण निष्पन्न झाला. ग्रामीण भागात श्रीगोंदा कारखाना-२, टाकळी लोणार-२, खरातवाडी-२, घारगाव-२, तरडगव्हाण-२,कोंडेगव्हाण-२, म्हातारपिंप्री-३ तर देऊळगाव, लोणी व्यंकनाथ येथे प्रत्येकी १ रुग्ण सापडला.अहमदनगरकडे जाणारा एक प्रवासी वाटेतच त्रास सुरू झाल्याने त्याने श्रीगोंदा कोविड केंद्रात चाचणी केली असता तो पॉझिटीव्ह निघाला.अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News