संकलन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
🌱बांधावरची शेतीशाळा🌱
नमस्कार मित्रांनो,
मागच्या भागात आपण कपाशीवरील बोंड आळीबद्दलची प्राथमिक तसेच सविस्तर माहीती आपण पाहीली आहे.
आजच्या भागात आपण कपाशीवरील बोंड आळी नियंत्रणबद्दल आपण माहीती घेणार आहोत यात प्रथम आपण
सेंद्रीयबोंड आळीच्या प्रार्दुभाव वाढीची कारणे पाहु या.
१)असंख्य संकरित वाण निर्माण झाल्यामुळे त्याच्या फुलोरा आणि फळधारणेच्या कालावधी वेगवेगळा असतो त्यामुळे सेंद्रिय बोंड आळी च्या एका पाठोपाठ येणाऱ्या पिढीला खाद्य पुरवठ्याचा खंड पडत नाही.
२ सेंद्रिय बोंड आळीने क्राय १अ.सी. आणि क्राय२
अ.बी. या दोन्ही जनुकांप्रती प्रतिकार क्षमता निर्माण केल्यामुळे ही आळी बोलगार्ड दोन कापसा वरून सुद्धा सहजपणे जगू शकते.
३) जास्त कालावधी च्या संकरित वाणाची लागवड केल्यामुळे गुलाबी बोंड आळीला यजमान वनस्पती द्वारे खाद्याचा जास्तीत जास्त दिवस पुरवठा होतो.
४)एप्रिल-मे महिन्यामध्ये लागवड केलेल्या कापसाचा फुलोरा जून-जुलैमध्ये येणाऱ्या बोंड आळी साठी लाभदायक ठरतो.
५ सुरुवातीला पेरलेले पीक आणि नंतरचे पीक यांच्या सलग उपलब्ध देते मुळे सेंद्रिय बोंड आळी ला वर्षभर निरंतन खाद्य पुरवठा होतो आणि एका वर्षात या किडीला अनेक पिढ्या तयार होतात.
६) बी.टी. कशाच्या कडेने नॉन बी.टी. कापसाच्या वाणीची आश्चर्यपिक म्हणून लागवड न केल्याने सेंद्रिय बोंड आळीचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत झाली.
७)कपाशीचे पीक नोव्हेंबर नंतर किंवा काही शेतामध्ये एप्रिल ते मे पर्यंत ठेवल्यास सेंद्रिय बोंड आळी चा निरंतर खाद्य पुरवठा होत राहतो.
८) जिनिंग मिल आणि मार्केट यार्ड मध्ये ये कच्च्या कापसाची जास्त कालावधीसाठी साठवणूक केल्यामुळे नंतर लागवड होणाऱ्या कापसाच्या पिकासाठी शेंद्रिय बोंड आळी चे स्त्रोत स्थान म्हणून काम करते.
९) वेळेवर आणि योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे शेंदरी बोंड आळीचा प्रादुर्भाव बी.टी.कपाशीवर वाढत आहे.
*कपाशीवरील गुलाबी बोंड आळीचे असे करा व्यवस्थापन*
१) कापूस पिकाचा हंगामा डिसेंबर-जानेवारी दरम्यानच संपुष्टात आणावा.
२) पूर्वहंगामी एप्रिल-मे कापसाची लागवड टाळावी.
३) अर्धवट उमलेली प्रादुर्भावग्रस्त बोंड व पिकाचे अवशेष त्वरित नष्ट करावे.
४) बीटी बियाणे सोबत गैर बीटीचे बियाणे दिले असल्यास त्याची आश्रय पीक म्हणून लागवड करावी.
५) गुलाबी बोंड आळी ने प्रादुर्भावग्रस्त कापसाची गोदामा यामध्ये साठवण करू नये.
६)संकरित बीटी सरळ वाणाचे बियाणे नेहमी अधिकृत्य विक्रित्याच्याकडूनच खरेदी करावे व दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे.
७) शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्की होणारे बीटी कापूस अथवा सरळ वाहनाची वेळेतच म्हणजे जून महिन्यात पेरणी करावी.
८) गुलाबी बोंड आळी चा जीवनक्रम खंडित करण्यासाठी पिकाची फेरपालट करावी.
९)पतंगाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पेरणीच्या 45 दिवसानंतर हेक्टर 10प्रमाणे कामगंध सापळे लावावेत.
१०) कपाशी पिकावर गुलाबी बोंड आळी च्या प्रार्दुभाव चे निदान करण्यासाठी पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत वेळोवेळी निरीक्षण करावे.
११)बोंडे लागण्याच्या अवस्थेत एक एकर क्षेत्रातून वेगवेगळ्या झाडांची 20 बोंडे तोडून ती फोडून पहावीत.
१२)खाली गळून पडलेल्या प्रादुर्भावग्रस्त पात्या फुले व बोंडे गोळा करून त्वरित नष्ट करावीत लागवडीच्या 60 दिवसानंतर निंबोळी अर्क प्लस नीम तेल पाच मिलि प्रति लिटर याप्रमाणे एक फवारणी करावी.
१३) ज्या ठिकाणी उपलब्धता असेल तिथे ट्रायकोग्रामा बक्टी या गुलाबी बोंड आळी च्या अंड्यावर उपजीविका करणारा परोपजीवी मित्रकीटक 6000प्रति एकर याप्रमाणे एका आठवड्याच्या अंतराने कपाशीच्या फुलोरा अवस्थेत प्रसारण केल्यास चांगले नियंत्रण मिळते.
१४) मान्यता असलेल्या व शिफारस केलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी जहाल विषारी किंवा उच्च विषारी गटातील कीटकनाशकांची फवारणी टाळावी.
१५) कीटकनाशकाच्या मिश्रणाचा काटेकोरपणे वापर टाळावा.
१६) पिकाचा कालावधी वाढवणारी कीटकनाशके जसे की असिफेट चा वापर सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये टाळावा.
१७)पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव ग भाव टाळण्यासाठी नोव्हेंबरपूर्वी कुठल्याही प्रकारच्या सिंथेटिक पायरेथोइड फिप्रोनिल इत्यादी कीटकनाशकांचा वापर करू नये.
१८)आर्थिक नुकसान पातळी (आठ पतंग प्रति कामगंध सापळा प्रतिदिन सतत तीन दिवस किंवा एक अळी प्रतिदहा फुले किंवा एक अळी प्रति दहा हिरवी बोंडे) ओलांडल्यास खालील तक्त्यात दिलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा गरजेनुसार वापर करावा.
१९) स्वच्छ व निरोगी कापसाची स्वतंत्र व्यसनी करून विक्री अवस्था योग्य साठवणूक करावी तसेच कीडग्रस्त कापूस त्वरित नष्ट करावे.
२०) सूतगिरणी जिनिंग मिल मध्ये साठवलेल्या कीड ग्रस्त कापसात सुप्त अवस्थेत असलेल्या काळापासून निघणाऱ्या पतंगांना पकडण्यासाठी त्या परिसरात कामगंध अथवा प्रकाश सापळे लावावेत व जमा झालेले पतंग नष्ट करावेत.
सहकार्य -निलेश बिबवे शेतीशाळा प्रशिक्षक कृषी सहाय्यक तालुका कृषी विभाग कोपरगाव