50 लोकांचे स्वाब घेण्यात आले पैकी 4 जण कोरोना बाधीत, कुरकुंभ 2 एकेरीवाडी 2 तर 46 निगेटिव्ह,शहरात 2.


50 लोकांचे स्वाब घेण्यात आले पैकी  4 जण कोरोना बाधीत,  कुरकुंभ 2 एकेरीवाडी 2 तर 46 निगेटिव्ह,शहरात 2.

विठ्ठल होले पुणे

  दौंड प्रतिनिधी--- ग्रामीण भागातील रुग्णांच्या संपर्कातील 50 जणांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी चार जण नव्याने पोझिटीव  आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 7/8/20 रोजी एकुण 29जनाचे swab तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचे report आज दिनांक 8/8/20 रोजी प्राप्त झाले. त्यापैकी एकूण 2व्यक्तीचे स्वाब positive आले आहेत तर 27व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये महिला-- 1,पुरूष --1,दौंड शहर -2,शिवाजी चौक-1सरस्वती नगर-1,वयोगट--30ते  78वर्ष असल्याची माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली. मागील आठ दिवसांची  आकडेवारी पाहता कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे,बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे,अशीच जनतेने योग्य ती काळजी घेतल्यास आपण सर्वजण ही लढाई नक्कीच जिंकणार आहोत,लग्न समारंभ,अंत्यविधी अशा ठिकाणी  जाणे शक्यतो टाळावे,घरातील  लोकांनी या बाबीकडे लक्ष दिले तर वाढणारा संसर्ग रोखता येईल.सुरक्षित रहा काळजी घ्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News