हर्षवर्धन पाटील मंत्री असताना भिगवण येथे मंजूर केलेल्या ट्रोमा केअर सेंटरचे कोरोना उपचार केंद्र म्हणून सभापती पुष्पा रेडके यांच्या हस्ते उदघाटन-


हर्षवर्धन पाटील मंत्री असताना भिगवण येथे मंजूर केलेल्या ट्रोमा केअर सेंटरचे कोरोना उपचार केंद्र म्हणून सभापती पुष्पा रेडके यांच्या हस्ते उदघाटन-

इंदापूर, काकासाहेब मांढरे प्रतिनिधी :

भिगवण येथील कोविड सेंटर चे उद्घाटन सभापती पुष्पा रेडके यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना पुष्पा रेडके म्हणाल्या की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री असताना मंजूर केलेल्या भिगवण ट्रोमा केअर सेंटर सेवेसाठी तयार झाले असून या मध्ये आज कोविड सेंटर चे उद्घाटन संपन्न झाले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भिगवन व निमगाव केतकी येथे कोविड सेंटर उपलब्ध करण्याची मागणी केली होती यामुळे भिगवण व परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेता इंदापूर पंचायत समिती व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या वतीने आज भिगवण येथे कोविड सेंटरची उद्घाटन करण्यात आले असून भविष्यात निमगाव केतकी येथे सेंटर उभारले जाईल. कोरोना महामारी चे संकट वाढत असल्याने भिगवण परिसरातील नागरिकांना पुणे व इतर ठिकाणी उपचारासाठी जावे लागत होते यामुळे या परिसरातील नागरिकांना आपल्या भिगवण शहरांमध्ये उपचार मिळावे या साठी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

यावेळी उपसभापती संजय देहाडे म्हणाले की भिगवन येथील नागरिकांच्या आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या होत्या, कोविड सेंटर मुळे मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यावेळी प्रास्ताविक करताना इंदापूर अर्बन बँकेचे संचालक अशोक शिंदे सांगितले की ही ट्रोमा सेंटर ची इमारत होण्यासाठी स्वर्गीय रमेश बापू जाधव व परिसरातील सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधून आघाडी सरकारच्या काळात आरोग्यमंत्री शेट्टी यांच्याकडून इमारत मंजूर करण्यात आली आहे, त्यामुळे या उद्घाटन प्रसंगी स्वर्गीय रमेश बापू जाधव यांची आठवण येत आहे. यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती भिगवन चे माजी सरपंच पराग जाधव,अशोक वणवे,कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंत आप्पा वाघ, संपत बंडगर,सूर्यकांत सवाने, तक्रारवाडी च्या सरपंच शोभा वाघ, सतीश काळे,तेजस देवकाते, हनुमंत काजळे, सुनील काळे, माऊली मारकड,व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News