निष्क्रिय ऊर्जामंत्री नितीन राऊत राजीनामा द्या -संभाजीराव जाधव


निष्क्रिय ऊर्जामंत्री नितीन राऊत राजीनामा द्या -संभाजीराव जाधव

( पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्सची मागणी)

-------------------------------------------

ठाणे- प्रतिनिधी

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे महाभंयकर संकट तसेच अतिवृष्टी मुळे राज्यातील जनता त्रस्त असून आपण मंत्री असलेल्या खात्याचा सावळा गोंधळ चालू आहे. 

 राज्यात अनेक ठिकाणी आठ ते नऊ तास कधी कधी चोविस तास विद्युत पुरवठा खंडित असतो. त्यामुळे सामान्य जनता ,शेतकरी, व्यापारी, विध्यार्थी, नोकरदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, विद्युत पुरवठा ही अत्यावश्यक सेवा असून लोकांना ती मिळायलाच हवी.

लॉकडाऊन च्या काळात विज पुरवठा खंडित झाल्याने वर्क फ्रॉम होम काम करणाऱ्या लाखो नोकरदाराना पगार मिळणं कठीण झाल्याने जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बऱ्याच लोकांनी ऑनलाइन विज बिले भरली असून सुध्दा पाच ते दहा पटीने खोटी विजबिले पाठवून संबंधित अधिकारी नाहक त्रास देत आहेत.

साहेब आपणास जनतेने निवडून दिले आहे ते जनहिताच्या कामासाठी आपण ऊर्जा मंत्री आहात आपल्या खात्यात होणारा सावळा गोंधळ थांबवून राज्यातील जनतेला योग्य तो न्याय मिळऊन द्यावा किंवा आपण आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा. 

मा. मुख्यमंत्री: ऊधवजी ठाकरे साहेब व मा. ऊर्जा मंत्री :नितीन राऊत साहेब यांना लेखी निवेदन दिले असून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्स रस्त्यांवर उतरल्या शिवाय राहणार नाही असे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव: संभाजीराव जाधव यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News