उल्लेखनीय कार्य करणारे तहसीलदार योगेश चन्द्रे यांचा सत्कार


उल्लेखनीय कार्य करणारे तहसीलदार योगेश चन्द्रे यांचा सत्कार

शिर्डी प्रतिनिधी ,राजेंद्र दूनबळे

कोपरगांव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने कोपरगांव तहसिल कार्यालय येथे शासकीय पुरस्कार प्राप्त श्री योगेश चंद्रे त्यांचे कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख सत्कार करुन सन्मानित करण्यात आला.

मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली म्हणून धुरा सांभाळताना...

★ लोकसभा - २०१९ विधानसभा - २०१९ या दोन्ही निवडणूक त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या आहे...

★ भारत सरकारचे जलशक्ती अभियान शिर्डी उपविभागात यशस्वीपणे राबविण्यात आले.त्याचा लाभ आज सर्वांना होत आहे...

★ सन २०१९ रोजी गोदावरी नदीला आलेल्या महापुर या संकटात मोठ्या हिमतीने प्रशासनाच्या सर्व घटक आणि जनतेला सोबत घेवून मोठी कामगिरी केली आहे...

★ अनुलोम अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील पाझर तलाव खोलीकरणचे सन १९७२ चे दुष्काळानंतर सर्वाधिक मोठे काम घेतले आणि यशस्वीपणे केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पिण्याचे आणि शेतीचे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठी मोलाची मदत झाली आहे...

★ कोपरगांव शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणारा ५ नंबर तळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे...

★कोरोना संकट काळात सर्व अधिकारी यांचे सहभागातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य अहोरात्र सुरु ठेवले आहे...

सतत लोकांच्या प्रश्नासाठी मनापासून अहोरात्र झटणार्या मान.श्री योगेशजी चंद्रे साहेब यांच्या कार्याला गौरव केला. त्या वेळी अशोकराव खांबेकर, नितीनराव शिंदे, तुषारजी पोटे, शब्बीरभाई शेख, विजयराव जाधव, राहुल गवळी, चंद्रहार जगताप, मनोज बिडवे, दादा आवारे, निबांळकर व इतर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News