श्रीगोंदा तालुक्यात एकाच दिवशी तीन घरफोड्या: १ लाख ७४ हजार रुपयांचे दागिने व मोटारसायकल लांबविले: अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांची भेट.


श्रीगोंदा तालुक्यात एकाच दिवशी तीन घरफोड्या: १ लाख ७४ हजार रुपयांचे दागिने व मोटारसायकल लांबविले: अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांची भेट.

श्रीगोंदा प्रतिनिधी (अंकुश तुपे) : 

श्रीगोंदा तालुक्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोड्या करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व मोटारसायकल लांबविली. तालुक्यात लॉक डाऊन घोषित केल्यापासून आजपर्यंत चोऱ्यांच्या सत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या चोऱ्या थांबविण्याचे श्रीगोंदा पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

       आढळगाव येथील मारुती बापू मिसाळ, मिसाळवस्ती यांच्या घराच्या पाठीमागून शिडी लावून अज्ञात चोरट्यांनी छतावरून घरात प्रवेश केला व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हिच्या गळ्याला चाकू लावून मंगळसूत्र व कानातील दागिने हिसकावून व घरात ठेवलेली रोख रक्कम घेऊन जाताना धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी देऊन चोर पसार झाला.त्यांच्या घराशेजारी काही अंतरावर राहत असलेल्या रेखा मारुती गिरमकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व तलवारीचा धाक दाखवून मंगळसूत्र, कानातील झुबे, कुडके दागिने हिसकावून घेतले या दोन्ही कुटुंबातीचे मिळून रोख रक्कम व दागिने मिळून ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पसार केला.

     तिसऱ्या घटनेत शरद बापूराव कानगुडे रा. टाकळी लोणार यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घराची उचकापाचक करून रोख रक्कम ४५ हजार व घरापुढे लावलेली एम एच १६ सी आर ३६८६ ही होंडा कंपनीची ४५ हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला..याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

       घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक नगर दिपाली काळे, विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष गावीत हे करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News