गृहा येथील रोहन ओहळ १८ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या


गृहा येथील रोहन ओहळ १८ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

राहुरी फॅक्टरी / प्रतिनिधी-विजय एस भोसले

राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, राहूरी कारखाना तरुणांनी आत्महत्या करून आपली जिवन यात्रा संपविल्याच्या घटना घडल्या असतानाच  गुहा येथील १८ वर्षीय तरुणाने काल दुपारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

  गुहा गावातील रोहन बबन ओहळ हा काल सकाळी आपल्या चुलत भावाला राहुरी कारखान्यावर सोडविण्यास गेला असता मात्र बराच कालावधी लोटला तरी तो घरी आला नसल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. याचवेळी गुहा- तांभेरे रोडवर एका शेताच्या कडेला रोहन याची दुचाकी एका व्यक्तीस दिसली. आजूबाजूला सर्वत्र बघितल्या नंतर  शँका म्हणून जवळील एका शेतातील  विहिरीत पोहणारे काही तरबेज उतरले असता त्यांनी रोहनचा मृतदेह वर काढला. 

 त्यानंतर अविनाश ओहळ, चंद्रकांत थोरात , डॉ.विजय वाबळे यांनी घटनेची माहिती राहूरी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल आव्हाड दाखल होऊन पंचनामा केला. या प्रकरणी  राहूरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  रोहन याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. मयत रोहन याच्या पश्चात आई वडील, बहीण, आजी  असा परिवार आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News