प्रतिनिधी:राजेंद्र दूनबळे,
लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथील विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटंबना केली आहे तरी या घटनेचा अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जाहीर निषेध केला जात आहे, तरी नांदेड एस पी आणि गृहमंत्री यांनी सदर घटनेची माहिती घेऊन तात्काळ समाजकंटकांवर कडाक कारवाई करावी नाहीतर, या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटतील.
त्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी. अन्याय अत्याचार निर्मूलन समिती मा.रवींद्र दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सौ. रमादेवी धीवर,युवक जिल्हाध्यक्ष निखिल भोसले,जिल्हा उपाध्यक्ष कु.किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहर अध्यक्ष आकाश जाधव यांच्या हस्ते शिर्डी पोलिस स्टेशन ला निवेदन देण्यात आले. यावेळी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती चे शिर्डी शहरध्यक्ष आकाश जाधव आणि शिर्डी सरचिटणीस जुबेर पठाण हे उपस्थित होते.