दौंड तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले,ग्रामीण भागात 6 पुरुष 2 महिला पॉझिटिव्ह


दौंड तालुक्यात कोरोनाने  पुन्हा डोके वर काढले,ग्रामीण भागात 6 पुरुष 2 महिला पॉझिटिव्ह

विट्ठल होले पुणे

यवत प्रतिनिधी-- दौंड शहरासह तालुक्यात मागील चार पाच दिवसात निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली आहे,त्यामुळे जनतेत आनंदाची लाट होती परंतु आज ग्रामीण भागातील 69 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 8 व्यक्ती पॉझिटीव्ह  आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी सांगितले,यामध्ये 6 पुरुष 2 महिला आहेत,एकेरीवडी 1,पारगाव 2,कानगाव 1,खडकी 1, कूरकुंभ 2 असे आले आहेत,हे सर्व व्यक्ती या अगोदर आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत,त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, हस्तांदोलन  करू नये,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा,सर्वांच्या सहकार्याने आपण लवकरच दौंड तालुका कोरोना मुक्त करू या असे आवाहन डॉ अशोक राजगे यांनी जनतेला केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News