नगर जिल्ह्यात 757जणांना कोरोना संसर्ग नगर


नगर जिल्ह्यात 757जणांना कोरोना संसर्ग नगर

अहमदनगर संजय सावंत प्रतिनिधी:

 जिल्ह्यात आज ७५७ जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ४८, अँटीजेन चाचणीमध्ये ४०२ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत ३०७ रूग्ण बाधित आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना टेस्ट लॅब आणि अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ४५ हजार १७२ तपासण्या करण्यात आल्या आहेत. आता उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २९७६ इतकी झाली आहे तर जिल्ह्यात आज ३८५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४९६५ इतकी झाली असून रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ६१.७५ एवढी आहे. दरम्यान आज कोरोना उपचारादरम्यान ०६ जणांचा मृत्यू झाला जिल्ह्यात आतापर्यंत ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये दुपारी ३८ रुग्ण बाधित आढळून आले. त्यानंतर आणखी १० जण बाधित आढळून आले. यामध्ये अहमदनगर शहर ०४, नगर तालुक्यातील आलमगीर येथे, भिंगार आणि श्रीगोंद्यातील बेलवंडी येथे प्रत्येकी एक, कर्जत तालुक्यातील राशीन येथे ०२, जामखेड च्या कोर्ट गल्ली येथे एक, पाथर्डीतील जवखेडे येथे एका, असे रूग्ण आढळून आले.

अँटीजेन चाचणीत आज ४०२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये अहमदनगर शहर ३६, संगमनेर १८,  राहाता ६२, पाथर्डी ४०, नगर तालुका २८, श्रीरामपूर १५,  भिंगार शहर १०,  नेवासा १७,  श्रीगोंदा २७,, पारनेर २०, अकोले ०१, राहुरी ०३,  शेवगाव ३०,  कोपरगाव ६१, जामखेड १७ आणि कर्जत १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३०७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये अहमदनगर शहर २६४, संगमनेर ०९, राहाता ०४, पाथर्डी ०३,  नगर तालुका ०४, श्रीरामपूर ०७, नेवासा ०४, श्रीगोंदा ०२, पारनेर ०४, अकोले ०२, राहुरी ०२, शेवगाव ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News