महाराष्ट्रातील भू विकास बैंक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा.


महाराष्ट्रातील भू विकास बैंक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा.

इंदापूर काकासाहेब मांढरे प्रतिनिधी :

 राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउदेशिय विकास बँक कर्मचारी संघटना (महाराष्ट्र)  अध्यक्ष खासदार अनंदराव अडसुळ, एम.पी.पाटील कार्याध्यक्ष, ए.एम. थलवर प्रमुख कार्यवाह या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्ग दर्शना खाली शासनाने दि. २४.०७.२०१५ रोजी पारीत केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा भूविकास बँक बंद करण्याचा निर्णय सुमारे पाच वर्षापुर्वीच झालेला आहे. मात्र त्यापुढे याबाबत कर्मचा-यांच्या बाबतीत कोणतीच ठोस कर्यवाही झालेली नाही, शासन निर्णयानुसार बँकेची मालमत्ता विकुन त्यामधुन येणा-या पैशातुन संबंधित बँकेचे अधिकारी व कर्मचारी (सेवानिवृत्तीसह) यांना पैसे देणेसाठी विवीध अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी शासनाने बँकेची मालमत्ता ताब्यात घेवून, शासनानेच कर्मचारी वर्गाची आर्थिकदेणी दयावीत. याबाबत वैबिनेटचा प्रस्ताव सहकार विभागाने अर्थ विभागाकडे सादर केलेला आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष मा. अडसुळ साहेब यांनी वारंवार पाठपुरावा करूनही अर्थ विभागाने सदर प्रस्तावावर कोणतीच पुढील कर्यवाही केलेली नसल्याने सर्व कर्मचारी च त्यांचे कुटुंब अडचणीत आलेले आहे. कर्मचा-यांच्या मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे औषधपाणी इ. अडचणीमुळे वही कर्मचा-यांनी आत्महत्या देखिल केल्या आहेत. हि बाब अतिशय गंभीर आहे.

तरी त्यासाठी आपण विनंती की, फाईल नं एल. डी. बी./१०१५/प्र.क. २८/सी. का. ना.७६७ या प्रलंबित प्रस्तावावर दि. १४ ऑगस्ट २०२० पुर्वी संपुर्ण निर्णय न झालेस कर्मचा-यांना मंत्रालयासमोर आत्मदहन करणेशिवाय पर्याय राहणार नाही तरी याची नोंद घ्यावी. अशा प्रकारचे निवेदन मुख्य मंत्री मा . श्री .उद्धव ठाकरे, उपमुख्य मंत्री मा. श्री. अजितदादा पवार , मा.श्री. बाळासाहेब  थोरात सहकारमंत्री, मा. श्री. विश्वजित कदम सहकार राज्य मंत्री, मा. सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आल्या आहेत त्यामध्ये मागण्या मान्य झाल्यास मंत्रालयासमोर  आत्मदहन करण्याचा इशारा महाराष्ट्र शासनाला देण्यात आलेला आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News