कोराना रुग्ण उपचारातून निर्माण झालेल्या जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रशासनाचे लक्ष नियमानुसार जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट


कोराना रुग्ण उपचारातून निर्माण झालेल्या जैव वैद्यकीय    कचऱ्यावर प्रशासनाचे लक्ष नियमानुसार जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट

शिर्डी, (प्रतिनिधी )राजेंद्र दूनबळे: 

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांचे श्री साई आश्रम फेज 2 येथे सुरू करण्यात आलेले डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्ष येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. येथे तयार होणाऱ्या जैव वैद्यकीय घनकचरा हा अतिसंसर्गजन्य असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशानुसार त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अहमदनगर येथील मे.बायो क्लीन सिस्टिम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला जैव वैद्यकीय घनकचरा पाठविला जात आहे. श्री साईबाबा  हॉस्पिटल मधील बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट विभागामार्फत त्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.


            सदरचे केंद्र दिनांक 4 जून, 2020 पासून सुरू करण्यात आले असून तेथे निर्माण होणारा अतिसंसर्गजन्य जैव वैद्यकीय घनकचरा ज्यामध्ये वापर झालेले पीपीई किट, हातमोजे, मास्क  कॅप, फेस शिल्ड इत्यादी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार विल्हेवाट लावण्याकरिता स्वतंत्र वाहन व्यवस्था केलेली आहे. अहमदनगर येथील मे.बायो क्लीन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था जैव वैद्यकी कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांनी त्यासंबंधीचे काम सदरहम कंपनीस  दिलेले असून आजतागायत सुमारे एक हजार कलर कोडेड येलो बॅग्स भरून जवळपास दोन टन  इतका जैव वैद्यकीय घनकचरा शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणेकामी अहमदनगर येथे पाठविण्यात आलेला आहे. यासाठीचा खर्च  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्याकडून करण्यात येत आहे. परिसरात स्वच्छता राहील यासाठी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, वैद्यकीय पथक, नगर पालिका कर्मचारी लक्ष ठेवत असून या कामाची वेळोवेळी पाहणी करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News