प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना आवाहन


प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना आवाहन

 प्रतिनिधी ,राजेंद्र दूनबळे

अहमदनगर:- शासनामार्फत कोरोना विषाणुच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमिवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सध्या ई पॉस मशिनवर कार्यरत असलेल्या प्राधान्य कुटूंब लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना माहे जुलै ते नोव्हेंबर2020 या कालावधीत नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त प्रति सदस्य प्रतिमाह 3 किलो गहू व 2किलो तांदूळ मोफत देण्याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत.  माहे जुलै 2020 चे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यास दिनांक10 ऑगस्ट, 2020 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली असल्याने सर्व प्राधान्य कुटूंब लाभार्थी व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांनी प्रति सदस्य 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ आपले स्वस्तधान्य दुकानातून मोफत दिनांक 10 ऑगस्ट, 2020 पूर्वी घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केली आहे.

       तसेच मोफत धान्य वाटप करतांना ई-पॉसद्वारे मिळालेली पावती ग्राहकांना देणे अनिवार्य असल्याच्या सुचना यापूर्वीचरास्तभाव दुकानदार यांना दिलेल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांनी कोविड-19 च्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवररास्तभाव दुकानामध्ये गर्दी न करता प्रत्येक ग्राहकामध्ये किमान एक मीटर अंतर ठेवून तसेच तोंडाला मास्क लावून मोफत अन्नधान्याची उचल दिनांक 10 ऑगस्टपूर्वी सर्व लाभार्थ्यांनी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

            त्याचप्रमाणे दिनांक 11 ऑगस्टपासून माहे ऑगस्ट,2020 चे नियमित व मोफत अशा दोन्ही अन्नधान्याचे वितरण एकत्रितपणे सुरु करण्यात येणार आहे. याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. अशा प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ व अंत्योदय अन्न योजनेच्या कार्डधारकांसाठी प्रति कार्ड 25 किलो गहू व 10 किलो तांदूळ याप्रमाणे ऑगस्ट 2020 चे नियमित व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना प्रति सदस्य 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत धान्य दिनांक 11ऑगस्ट, 2020 पासून लाभार्थ्यांचे स्वत:च्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा घेऊन वितरीत करण्यात येणार आहे.

          अशाप्रकारे अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना या दोन्ही योजनांना माहे ऑगस्ट, 2020मध्ये  धान्याचा लाभ मिळणार असून सर्व लाभार्थी यांना त्याप्रमाणे सर्व लाभार्थी यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News