अन्याय अत्याचार निर्मूलन समिती शिर्डी यांच्या वतीने , प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन.


अन्याय अत्याचार निर्मूलन समिती शिर्डी यांच्या वतीने , प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन.

शिर्डी प्रतिनिधी, राजेंद्र दूनबळे

नगर मनमाड रस्त्यालगत शिर्डी पोलिस स्टेशन ते देशमुख चारी या परिसरात पावसाचे पाणी रस्त्यावर अतिशय जास्त प्रमाणात साचत असल्या कारणाने रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडून अपघात होत आहेत. आणि त्यामुळे कितीतरी कुटुंबातील व्यक्तींना आपला भाऊ,बाप,मुलगा, यांचा जीव गमवावा लागत आहे.

तसेच कोरोना महामारिमुळे जगाची तसेच देशाची परिस्थिती बिकट असताना ह्या साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपातील साथीचे आजार निर्माण होऊ शकतात. तरी आपण यासंदर्भात लवकरात लवकर या परिसरातील हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवून साईड गटारीचे काम सुरू करावे,अन्यथा अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य कडून आपल्या विरोधात आंदोलन करण्यात येईल.

अश्याप्रकारे शिरडी पोलीस स्टेशन ते देशमुख चारी ( नगर मनमाड रोड )लगत साईड गटारी बनविणे बाबत अन्याय अत्याचार निर्मूलन समिती मा.रवींद्र दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सौ.रमादेवी धीवर,युवक जिल्हाध्यक्ष निखिल भोसले,जिल्हा उपाध्यक्ष कु.किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकाऱ्यांना शिर्डी शहराध्यक्ष आकाश जाधव यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.यावेळी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती चे शिर्डी शहरध्यक्ष आकाश जाधव आणि शिर्डी सरचिटणीस जुबेर पठाण हे उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News